उपसंपादक/अशोक खंडारे
गडचिरोली जिल्ह्यातील ईल्लुर-आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील काही गावात पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पाण्याची अडचण होती. पिण्याच्या पाण्यासाठी व घरगुती वापरासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत होती. हि समस्या लक्षात घेवुन माजी जिल्हा परिषद सदस्या रुपालीताई पंदिलवार यांनी जिल्हा परिषदेकडे समस्या मांडली. पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून दिल्यास आष्टी इलूर क्षेत्रातील समस्या दूर होईल. असे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्याप्रमाणे प्रशासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत आलापल्ली मसाहत येथे नवीन पाण्याची ७० लाखाची टाकी मंजूर करण्यात आली व ठाकरी येथे २५,४१,५०४/- रुपयांचे नळ पाणीपुरवठा बांधकाम,व चपराळा येथे ३९,१,८०५/- रुपयांचे नळ पाणीपुरवठा बांधकाम.व चंदनखेडी येथे २९,१२,७९५/- रुपयांचे नळ पाणीपुरवठा बांधकाम,चौडमपल्ली येथे २५,७,४६६/- रुपयांचे नळ पाणीपुरवठा बांधकाम मंजूर करण्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या रुपालीताई पंदिलवार यांनी माहिती दिली.
सदर गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रकारचा त्रास सोसावा लागत होता. यामुळे महिला वैतागल्या होत्या. लांबून पाणी वाहण्यामुळे शारीरिक व्याधीही जडल्या होत्या.माजी जिल्हा परिषद सदस्या पंदिलवार यांच्या मदतीने महिलांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
पाण्याच्या कठीण कामातून मुक्तता झाल्यामुळे महिला आनंदी झाल्या आहेत. आष्टी ईल्लुर जिल्हा परिषद क्षेत्रातील आलापल्ली मसाहत, ठाकरी, चपराळा, चंदनखेडी, चौडमपल्ली येथील ग्रामस्थांनी रुपालीताई पंदिलवार यांचे आभार मानले आहेत.