कन्हान : – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विद र्भ प्रदेश स्तरीय नागपुर जिल्हा ग्रामिण व्दारे बहुजन नायक मा. कांशीरामजी यांचा स्मृतीदिन तसेच बीआर एसपी. पार्टी स्थापना दिना निमित्य संविधान चौक नागपुर येथुन जनचेतना रँली काढुन कन्हान येथील कुलदिप मंगल कार्यालयात मा. कांशीरामजी स्मृती दिन आणि बीआरएसपी वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला.       

     

        रविवार (दि.९) ऑक्टोबर २०२२ ला बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टी नागपुर जिल्हा व्दारे सकाळी १० वाजता संविधान चौक नागपुर येथुन जन चेतना रॅली काढुन इंदोरा, कामठी मार्गाने भ्रमण करित कन्हान येथील कुलदिप मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता आगमन होताच रँलीचे स्वागत करून मा. अरूणजी सहारे यांच्या प्रबोधनात्मक गीत गायना कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंनतर कार्य क्रमाचे अध्यक्ष अँड. डॉ. सुरेश माने सर, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बीआरएसपी, प्रमुख अतिथी मा. श्री प्रकाश भाऊ जाधव शिवसेना माजी खासदार रामटेक , संस्थापक अध्यक्ष ग्रामोन्नती प्रतिष्ठान, मा. ज्वालाताई धोटे सामाजिक कार्यकर्त्या नागपुर, प्रमुख उपस्थिती मा. विशेष फुटाणे अध्यक्ष विदर्भ प्रदेश बीआरएसपी, अँड. भुपेन्द्र रायपुरे उपाध्यक्ष विदर्भ प्रदेश बीआरएस पी, रमेश पाटील महासचिव विदर्भ प्रदेश बीआरएस पी, शांताराम जळते महासचिव विदर्भ प्रदेश बीआर एसपी, श्रीमती विश्रांती झांबरे संयोजिका महिला आघाडी विदर्भ प्रवेश, डॉ पूनम घोनमोडे, मिलिंद बांबोडे, डॉ विनोद रंगारी, विनायक वाघधरे आदी मान्यवरां च्या उपस्थित मा. बाबासाहेब आंबेडकर व मा. कांशीरामजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यापर्ण करून जय घोष करून मा. कांशीरामजी स्मृतीदिन व बीआरएसपी पक्षाचा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. 

            फुले, आंबेडकरी बहुजन आंदोलन गतीमान करण्यास बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांनी आपले जीवन चळवळीत समर्पित केले. फुले, आंबेड करी चळवळीचा १०८ वर्षाच्या संघर्षाची पुर्नमाडणी करून स्वबळावर संघर्ष निर्माण करून १९६५ ते २००६ असा ४१ वर्ष निरंतर संघर्ष करून ६००० जातीत विखुरलेल्या एस.सी, एस.टी, ओबीसी, मायना रिटी समाजाला संघटित करून भारतीय राजकारणात दबदबा निर्माण करून समाज परिवर्तनाचा लढा गती मान केला. पण २००६ साली (दि.९) ऑक्टोबर ला त्यांचे निर्वाण झाल्यानंतर कांशीरामजी प्रणित चळव ळ हळूहळू कमजोर होत गेली. ती २०१४ ला शुन्यावर आली. अशा वेळी मान्यवर कांशीरामजींचे वैचारिक वारसदार संविधान तज्ञ अँड. डॉ. सुरेश माने सर यांनी महाराष्ट्रातील चळवळीची धुरा आपल्या खांदयावर घेऊन मा. कांशीरामजी यांच्या ९ व्या स्मृतीदिनी (दि. ९) ऑक्टोबर २०१५ ला बहुजन रिपब्लिकन सोशालि स्ट पार्टीची स्थापना ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदा नावर एका भव्य कार्यक्रमात केली. (दि.९) ऑक्टोबर २०२२ ला बीआरएसपी ला ७ वर्ष पुर्ण झाल्याने त्या निमित्त मा. कांशीरामजी स्मृतीदिन व बीआरएसपी पक्षाचा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष श्री कृपासागर भोवते सर यांनी तर आभा र प्रदेश महासचिव शांताराम जळते सर हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री शांतारामजी जळते प्रदेश महासचिव, श्री कृपासागर भोवते जिल्हा ध्यक्ष, ग्रामिण श्री हरीदासजी चिंटोले, जिल्हा महासचि व, श्री सुनिलकुमार वासनिक, जिल्हा महासचिव श्री संतोष गायकवाड, महासचिव श्री झोडापेजी उमरेड विधानसभा, श्री गौतम जांभुळकर, नरेंद्र रंगारी, राहुल वानखेडे, दुर्गा निकोसे, उषा सांगोडे, प्रतिभा घोडेस्वार, मायाताई चिमणकर, प्रतिमा चौरे, गडपाडे मॅडम, संध्या साखरे, वर्षा फुटाणे, रंजना हुड, आम्रपाली वानखेडे तसेच नागपुर शहर, ग्रामिण चे सर्व बिआर एसपी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News