प्रदीप रामटेके

संपादकीय

 

आजच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे हे भारतातील चिरपरिचित व्यक्तीमत्व आहेत व लाखो जनांचे श्रध्दा स्थान आहेत.ज्यांच्या वडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अनेकांना भरभरून दिले,त्यांच्या चिरंजीवांचे नुकसान झाले व नुकसान होणार? हा वैचारिक वादच निर्थक आहे.

जनकल्याणासाठी संघर्ष करीत असताना राजकीय चळवळीच्या माध्यमातून अनेकजण जुळतात किंवा जोडले जातात व यातीलच काहीजण त्यांच्या कार्यान्वये पक्षप्रमुखांच्या अगदी जवळचे होतात.

जे जवळचे होतात त्यांच्यावर पक्षप्रमुख विश्वास दाखवितात व त्यांना पक्षांचे पदाधिकारी बनवीत अशा पदाधिकाऱ्यांना पक्ष विचारातंर्गत लोकप्रतिनिधी बनण्याच्या लायकीचे केली जातात.

पक्षप्रमुख हे,आपल्या पदाधिकाऱ्यांत अनेक प्रकारच्या परिपक्व अशा वैचारिक गुणधर्माची वेळोवेळी भर घालतात,त्यांना विचारातंर्गत संघर्षमय करतात,तद्वतच त्यांना संकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वासी बनवितात.अर्थात सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पक्षप्रमुख हे वैचारिक भट्टीत पकवितात आणि ध्येयवादी व ध्येयनिष्ठ बनवितात हे विसरता कामा नये.

संस्थापक शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव,माजी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे हे सुद्धा एका मजबूत वैचारिक संघर्षातून घडलेले कणखर नेतृत्व आहे.म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याकडे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कार्यभार सोपविलेला होता हे सुद्धा निकारुन चालता येत नाही..

मात्र,प्रश्न हा निर्माण होतो की स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या दुरदृष्टीच्या नेतृत्व गुणांवर व दुरदृष्टीच्या राजकीय क्षमतेवर,”फुटिर गटातील आमदार व खासदार हे माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना लक्ष करीत,अप्रत्यक्षपणे टिका करतात काय?की अप्रत्यक्षपणे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाच नाकारतात?हा सध्याचा आणि महत्त्वाचा विचार प्रवाह विना चर्चेंनी महाराष्ट्र राज्यातील जनतेला बरेच सांगून जातो आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्यात असलेला आदम्य आत्मविश्वास व त्यांच्यात ध्येय गाठण्याची असलेली कणखर नेतृत्व चिकाटी विजयी भव!असीच आहे.यामुळे त्यांच्या जवळ असलेला लाखो कार्यकर्ता वर्ग हा बेईमान व लाचार नाही,तद्वतच विकाऊ नाही असे महाराष्ट्र राज्यातंर्गत राजकीय क्षेत्रातील स्पष्ट चित्र आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या एका शब्दावर,एका हाकेवर ज्या निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांनी, अनेकांना खासदार,आमदार बनविले व निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांनी ज्यांना मंत्री केलेत,त्याच पक्षातील आमदार,खासदार फुटून जाण्याणे शिवसेना संपली किंवा शिवसेनेचा विचार संपला असे होत नाही,तद्वतच शिवसेना कमजोर झाली असे सध्या तरी म्हणणे सयुक्तिक नाही.

शिवसेना पक्षाचे नाव व पक्षाचे धनुष्य बाण चिन्ह,”केंद्रीय निवडणूक आयोगाने,सध्या स्थित गोठवले असले तरी माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या जवळ पक्ष कार्यकर्त्यांची असलेली बलाढ्य शक्ती आहे.यामुळेच पक्षप्रमुख आणि पक्ष कार्यकर्त्यांत असलेली मजबूत व अचूक वैचारिक दिशा महाराष्ट्र राज्यात केव्हाही आपला राजकीय दबदबा निर्माण करु शकते व सत्तेची उलथापालथ करु शकते याची भिती महाराष्ट्र राज्यातील इतर राजकीय पक्षांना आहेच.

म्हणूनच माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरेंवर व त्यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांवर – पक्ष कार्यकर्त्यांवर,ज्यास्तीत जास्त मारा करणाऱ्यांची फौज महाराष्ट्र राज्यात तयार करण्यात आल्याचे प्रथमतः लक्षात येते आहे.मात्र संघर्षान्वये परिवर्तनवादी व्यवस्थेचा विचार संपणारा नसतो,हे लक्षात घेतले तर माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे व त्यांचे पक्ष पदाधिकारी – पक्ष कार्यकर्त्या हे अनाठायी शाब्दिक माऱ्यांसाठी सर्व पक्षांच्या केंद्र स्थानी बराच काळ असणार आहेत.

परंतु ज्या शिवसेना पक्ष प्रमुखांनी अनेकांना मोठे केले व भरभरून अनेक प्रकारचे पद दिलेत,त्या पक्ष प्रमुखांना कुणीही हरवू शकत नाही किंवा कुणीही नमवू शकत नाही,हे सत्य सर्वांनी विनम्रपणे स्विकारले पाहिजे..म्हणजेच माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना फुटलेले आमदार किंवा खासदार कुठल्याही काळात पराभूत करू शकत नाही हे वास्तव आहे…(उमेदवार निवडून येणारी प्रक्रिया ही पक्षांतर्गत नेतृत्व गामीन्याची व नेतृत्व शक्तीची एक बाब असते..)

याचबरोबर आजच्या घडीला माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांचा एक आवाज म्हणजे पक्ष व पक्ष चिन्हांची ओळख होय.यामुळे पक्षाचे नवीन नाव व पक्षाचे नवीन चिन्ह एका दिवसात सर्व कार्यकर्त्यांच्या मनात कोरले जाणार असल्याने,पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या नावाची व पक्षाच्या चिन्हाची चिंता नाही..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com