गावांमधील अंडरग्राउंड ड्रेनेजची दुरावस्था… — चेंबर मधील दुर्गंध पाणी निघाल्याने भीमा नदी पुलावर गटाराचे साम्राज्य…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या संपूर्ण आराखड्यातील कामाचा दर्जा तपासावा काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने यापासून ग्रामस्थांना व भाविकांना त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

            लक्ष्मी नरसिंहाच्या 260 कोटी रुपये आराखड्यातील अंडरग्राउंड ड्रेनेजची दुरावस्था झाल्याने पाईप लाईनच्या चेंबर मधील दुर्गंधी पाणी काही ठिकाणी निघत आसल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी येत आहे.

          भीमा नदीवरील पुला शेजारील चौकात दुर्गंधीचे पाणी काँक्रिटी रस्त्यारुन नदीपात्रात वहात आहे. लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे पुरातण काळातील देवस्थान आसुन या भागाचे कुलदैवतही आहे. दररोज हजारो भाविक दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. 

            भीमा नदीवरील पुलाच्या बाजूस चौकामध्यील दुर्गंधीला सामना करावा लागत आहे. कोठ्यावधी रुपये खर्च करून सुद्धा कामे निकृष्ट दर्जाची का होत आहेत. भाविक व ग्रामस्थांना कडून चर्चा होत असल्याचे पहावयास मिळत आहे . 

           ग्राम पंचायतीच्या वतीने विद्यमान सरपंच अर्चना सरवदे व सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे व आजी-माजी सरपंच उपसरपंच यांनी अनेक वेळा ड्रेनेजच्या चेंबर मधील दुर्गंधी पाण्याच्या सूचना देऊन सुद्धा अध्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

         एकीकडे डेंगू ताप ,मलेरिया , आशा रोगाची साथ चालू असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे कुलदैवत असल्यामुळे एवढा मोठा निधी मिळालेला आहे. याबद्दल ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत. 

            दुसऱ्या बाजूने ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे लक्ष्मी नरसिंहाची कामे काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. याची पुरेपूर चौकशी करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.