भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90 व्या वर्धापनदिना निमित्त जिल्हा अंमलबजावणी कक्ष चंद्रपूर,व गेवरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या परिसरात विहीरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

            या कार्यक्रमा अंतर्गत काजु आंबा,फणस,चिक्कु, पेरू,आवळा,इत्यादी प्रकारचे काही फळ झाडे लावण्यात आली व कंपनी सभासदांना एकुन१०० फळझाडांची वाटप करण्यात आले.

          या कार्यक्रमास जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पाचे पुरवठा व मुल्य साखळी तज्ञ, गणेश मादेवार, वित्तीय सल्लागार नंदकिशोर काळे, चंद्रपूर गडचिरोली फार्मर प्रोड्युसर कंपनी चे संचालक चेतन रामटेके,गेवराई फार्मर चे. दिलीप फुलबांधे, राजेंद्र वाघरे राकेश निखारे वनीता कोटांंगले व कंपनी सिईओ नुपूर फुलबांधे,व कंपनी सभासद उपस्थित होते.

          दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त सायबर सुरक्षा, या विषयावर आँनलाईन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, जागरुकता व उपाय यावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.