सामुहीक वनहक्क कार्यशाळेचे आयोजन…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

           टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई यांच्या वतीने सावली तालुक्यातील विहीरगाफव येथे सामुहीक वनहक्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

         वनहक्क कायदा २००६ नियम २००८ सुधारीत अधि २०१२ नुसार सामुहीक वनहक्क प्राप्त झालेल्या विहीरगांंव, चिखली, गेवरा बुज येथील ग्राम सभांच्या सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती सदस्यांचे क्लस्टर प्रशिक्षण मौजा विहीरगाव येथे पार पडले.

            वनहक्क समीती सदस्यांना सामुहीक गौण संसाधनांचा विकास,व्यवस्थापन व उपजिविका,सामाजिक आराखडे नियोजन व अंमलबजावणी शास्वत पर्यावरण विकास ,नरेगा अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ग्रामसभेची नरेगा समीतीचे कर्तव्य जबाबदारी, एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या लाभधारकांना वयक्तीक लाभाच्या योजना, स्वयंरोजगार,शास्वत कृषी विकास ईत्यादी विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

          दरम्यान उपजिविकेचे साधन म्हणुन फळबाग विकसीत करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वैयक्तीक अनुसूचित जमाती व ईतर ग्रामसभा सदस्यांना फळ वर्गीय झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

           कार्यशाळेला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे नितीन ठाकरे, प्रवेश सुटे,यांनी मार्गदर्शन केले.सुत्र संचालन सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती चे सचिव श्री दिलीप फुलबांधे यांनी केले आभार प्रदर्शन नरेगा समीती अध्यक्ष कुसमाकर वाकडे यांनी यावेळी विहीरगांव समीतीने अध्यक्ष हिवराज गायकवाड, सरपंंच हेमंत ढोक, चिखली समीतीचे अध्यक्ष हरेंद्र मसराम, व युवराज चौधरी,राजेश वाकडे,नितीन वाकडे,अंबादास वाकडे, सुरेश काळबांधे,वनीता कोटंगले, रुख्मा घरत,रुपाली बारेकर,कांता धारणे,यांनी कार्यशाळा यशस्वीते करीता सहकार्य केले.