सततच्या पावसामुळे गर्भ अवस्थेतील धान पिकांचे नुकसान,शासनाने नुकसान भरपाई द्यावी:-प.स.सदस्य अनील किरणापुरे..

  संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक

   दखल न्यूज भारत 

           9 सप्टेंबरच्या दुपार पासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे.या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे गर्भ अवस्थेत व निसवा अवस्थेत असलेले भात पीक पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

         यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.तसेच सलग तुर पीकांचे,मिरची नर्सरी रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

          सावली तालुका बरोबर भंडारा जिल्ह्यातील भात पिकांसह इतर पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासन-प्रशासन स्तरावरुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.

          याचबरोबर पूर परिस्थितीची पाहणी करून सरसकट मदत करावी,या बाबतची मागणी प.स.सदस्य अनील किरणापूरे यांनी केली आहे.