गेल्या 60 वर्षापासून देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत केवळ राजकारण…….. — आम्ही भारतीय जनता कुठे?      भाग – १…

           ज्या स्वातंत्र्य योद्ध्यानी जाती – धर्माच्या पलीकडे जाऊन स्वतःचे सर्वस्व अर्पूण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले…

        स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सर्वच देशभक्तांनी आपला देश पुन्हा कधीही पारतंत्र्यात जाऊ नये म्हणून, सर्वस्वी प्रयत्न करून एक लोकशाहीप्रधान देश घडवून हजारो वर्षानंतर ( पाऊणेचार हजार वर्षानंतर ) सार्वभौमत्वाची फळे चाखण्यास सुरुवात केली.

      विशेष करून हजारो वर्षाच्या दूरदृष्टीने विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तसे संविधान या लोकशाहीला टिकविण्यासाठी देशाला सर्व प्रकारचे संघर्ष करून प्रदान केले.

        वरील सर्व त्यागी,संघर्षी,समर्पित खऱ्या देशभक्तांच्या आशा आकांक्षाना आजच्या राजकीय पक्षांच्या सर्वच नेत्यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थी महत्वाकांक्षेपोटी काळे फासले..

           दर पाच वर्षांनी निवडणुका ( सर्वच क्षेत्रातल्या ) येतात आणि जातात. यामध्ये विशिष्ट वर्गच अती श्रीमंत होत जातो आणि गरीब आर्थिक दृष्ट्या अती गरीबच होत जातो.अशी अर्थव्यवस्था निर्माण केल्या गेली.

        लोकशाहीत कोणतीही आर्थिक विकासाची योजना न राबविता, कोणत्याही सवलती न देता, कोणतेही आरक्षण न देता, संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज या व्याख्येनुसार भारतीय समाजाची निर्मिती करणे म्हणजे खऱ्या लोकशाहीला अविष्कारीत करणे होय…..

       आणि याच दिशेने देशाला घेऊन जाण्यासाठीच संविधानाची निर्मिती केली, जेणेकरून स्वातंत्र्य, समता,न्याय आणि बंधुता या नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आधारितच देश घडविण्यासाठी येणारी भावी पिढी मार्गक्रमण करिन आणि येणाऱ्या 20 / 25 /30 वर्षात आपले लक्ष जरूर गाठेन ही अपेक्षा त्या खऱ्या देशभक्तांनी वर्तवली असेल…

       परंतू ,आज 70 वर्षे उलटून सुद्धा आमची व्यवस्था आम्हाला ( भारतीय जनतेला ) या मूळ उद्देशापासून कोसो मैल दूर नेऊन केवळ पाच वर्षातून एकदा EVM चे बटण दाबा आणि दरमहा 15 किलो रॅशन घेऊन गप्प बसा, अशा गुलामीत आणून ठेवले…

          आम्ही सुद्धा याला नशीब समजून काही का असेना पण मोफत मिळते म्हणून उपकाराच्या भाषेत आम्ही अशी लोकशाही समजून घेतली.

        आमचा जो सुशिक्षित वर्ग आहे. जो ही थोडीफार व्यवस्था जाणतो आहे. तो एकतर दारिद्र्याने पच्छाडलेला आहे किंवा अनैतिक मार्गाने श्रीमंत झाल्यामुळे व्यवस्थेच्या विरोधात तोंड उघडायला तयार नाही. जो दारिद्र्यात पच्छाडलेला त्यावर जनता विश्वास ठेवत नाही. म्हणजे सर्व बाजूनी जनतेला आणि पर्यायाने लोकशाही व संविधानाला तोंड दाबून बुक्क्याचा मारा गेल्या 70 वर्षांपासून सुरु आहे.

      2014 पासून तर याने कोरोनाची गती घेतली आहे…..!

         या सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त होण्यासाठी संविधान जागृती हा एकमेव उपाय आहे. म्हणून येत्या2024 विधानसभा निवडणुकीनिमित्त दररोज याच शीर्षकाखाली वैचारिक लेखमालेचे भाग प्रकाशित होणार आहेत….

   त्याची वाचकांनी नोंद घ्यावी….

             जागृतीचा लेखक

                अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…