संजीवन महीला व बालकल्याण संस्था,अमरावती तर्फे जि.प. शाळा अडगाव बु. येथे शालेयपयोगी साहित्याचे वितरण….

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

       शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. पूर्व माध्यमिक मराठी शाळा,अडगाव बु.येथे संजीवन महिला व बालकल्यान संस्था,अमरावती तर्फे शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, बुट, साॅक्स, पाऊच, नोटबुक, पेन, पेन्सिल, बिस्केट या शालापयोगी साहित्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

        या शानदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मांजरी म्हसला केंद्राच्या केंद्रप्रमुख कल्पनाताई ठाकरे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून संजीवन महीला व बालकल्यान संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. कल्पना महाजन, संस्थेचे सचीव सुनिल महाजन, सहसचीव भावना लाठीया तसेच इतर ट्रस्टीज निरजजी लाठीया, नितीनजी सोमानी, आनंदजी नवसाळकर, निखीलजी बाहेती तसेच मातोश्री सुमनताई महाजन, शा.व्य.समिती अध्यक्षा मिनाताई टेकरवाडे, उपाध्यक्ष निलेशभाऊ परिमल, सरपंच्या मंगलाताई खडसे, उपसरपंच राहुल भेंडोलकार, ग्रामसेवक रोहित तायडे, मिलिंद पतंगराय, ग्रा.पं सदस्या जयमालाताई चोपकर, शैलाताई भांडवलकर, शा.व्य.समिती सदस्या आणि शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. माता सावित्रीचे प्रतिमा पूजनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका राणे, आणि शिक्षक ज्योती देशमुख, शिवहरी मुगल व किशोर गणवीर यांचा सत्कार करण्यात आला.

        आपल्या मनोगत मधे संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. कल्पना महाजन यांनी संस्थेविषयीची माहीती सांगितली तर संस्थेचे सचीव सुनिलभाऊ महाजन यांनी संस्थेने आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमाची माहीती दिली. त्यामधे प्रामुख्याने दिव्यांग मुलांना सायकल वाटप, दुर्गम भागात स्वेटर वाटप, ब्लॅंकेट वाटप, शालापयोगी साहित्य वाटप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाॅटर फिल्टर वाटप. इत्यादी उपक्रम राबवित असल्याबद्दल माहिती दिली.

         या प्रसंगी निखीलजी बाहेती आणि शिवहरी मुगल यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा कल्पनाताई ठाकरे यांनी मनोगत मधे समाजकार्य करणार्‍या संस्थेंनी जर आमच्या जिल्हा परिषद शाळेला शैक्षनिक भेटवस्तु व भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर आमच्या शाळा व आमचे विद्यार्थी खूप झपाट्याने प्रगती करतील आणि आमच्या शाळांचे रुपच बदलुन जाईल अशी आशा व्यक्त केली.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका राणे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर गणवीर यांनी केले तर आभारप्रदर्शन ज्योती देशमुख यांनी पार पाडले.

    या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता गटशिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे तसेच केंद्रप्रमुख कल्पनाताई ठाकरे, शा.व्य. समिती सदस्य रोहीतजी तायडे, मिलिंदभाऊ पतंगराय, निलेशजी परिमल, राहुलभाऊ खडसे, विषय साधनव्यक्ती अजय गावंडे, सर्व शिक्षकवृंद तसेच बहुसंख्य पालक, प्रतिष्ठित नागरिक गावकरी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.