सावली (सुधाकर दुधे)

 

सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील शेतकरी शरद पंढरी मुनघाटे(५०) हे शेतात निंदणा चे काम करीत असताना दुपारी 3 च्या सुमारास जोरदार विजेचा गडगडाट झालाा. त्यावेळी विज पडून शेतकरी जागीच ठार झालाा.  सोबतच शेतात पाच सहा महिला काम करीत होत्या. त्यापैकी एक महिला गंभीर आहे याची माहिती पाथरी पोलीस स्टेशनला देण्यात आलीी. ठाणेदार मोहोड आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

     तर सावली पासून जवळच असलेल्या चकपिरंजी (शाळा हेटी) येथील महिला मंगला सुधाकर येलेट्टीवार (55) शेतात निंदणाचे काम करण्यासाठी गेली,असता दुपारच्या सुमारास विज पडल्याने ती पण जागीच ठार झाली.

  

   मृत शेतक-याच्या आकस्मिक मृत्युने कुटुंबावर दुखा:चे सावट निर्माण झाले.तर अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com