उमेश कांबळे ता प्र भद्रावती-
दि. ११ सप्टे ला सन्नी पॉईंट हॉटेल येथे भद्रावती शाखेची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणीचा १ वर्षाचा कार्यकाळ संपताच वरिष्ठाच्या आदेशानुसार जुन्या कार्यकारणीत फेरबदल करून सर्वानुमते नवीन कार्यकारिणी गठीत करून नवनियुक्ताना पदभार सोपावून जबाबदारी सोपविली आहे. त्यात सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती तालुका शाखेला आज १ वर्षाचा ककालावधी लोटला आहे. विदर्भ अध्यक्ष नरेद्र सोनारकर, विदर्भ संघटक निलेश ठाकरे आणि जिल्हा अध्यक्ष सुजय वाघमारे यांच्या आदेशानुसार जुन्या कार्यकारणीत फेरबदल करून नवनियुक्ताना पदभार सोपविला आहे. त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रविण चिमुरकर, सचिव ज्ञानेश्वर हटवार, कार्याध्यक्ष मनोज मोडक, उपाध्यक्ष शिरीष उगे, संपर्क प्रमुख आशिष कोटकर, कोषाध्यक्ष हर्षानंद रामटेके, प्रसिद्धी प्रमुख उमेश कांबळे आणि सदस्य सृजन मांढरे आदींच्या नियुक्त्या करून भद्रावती शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीच्या नविन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात प्रविण रामचंद्र चिमुरकर यांची पुन्हा एकदा सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. प्रविण चिमुरकर हे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतात. ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावतीचे सहसचिव आहेत.
डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार यांची पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती च्या सचिव पदी निवड करण्यात आली. डॉ. ज्ञानेश हटवार हे यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी येथे प्राध्यापक असुन ते जिल्हा प्रतिनिधी, कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य, संघटक, चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक सेल चंद्रपूर, सचिव, विदर्भ साहित्य संघ भद्रावती, अध्यक्ष, शिक्षक भारती (कनिष्ठ महाविद्यालय) चंद्रपूर संचालक, ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय कोंढा जि.भंडारा, सदस्य, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती, पदाधिकारी, संताजी स्नेही मंडळ भद्रावती अश्या विविध पदभाराने सन्मानित आहे.
भद्रावती शहरातील मनोज काच भांडार नावाने प्रसिध्द, सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकारितेतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे मनोज मोडक यांची पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती येथे कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
शिरीष उगे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करत असुन शिरीष उगे हे प्रेस फोटोग्राफर म्हणून तिन वर्षापासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र फोटो स्टुडिओचे संचालक, भद्रावती इको-प्रो संघटना सदस्य, धनगर जमात संघर्ष समिती चंद्रपूर सदस्य, अहिल्या उत्सव समिती वरोरा सचिव अश्या विविध पदावर कार्यरत आहेत.
हर्षानंद पुंडलीक रामटेके यांची कोषाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. हर्षानंद रामटेके हे माजरी येथील रहिवासी असुन ते इंजिनीयर आहे शिवाय ते समता सैनिक दल सामाजीक संघटनेचे काम करतात.
आशिष कोटकर यांना संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. आशिष हे शेगाव येथील रहिवासी असुन पत्रकारीतेच्या माध्यामातुन शेगाव येथील अनेक समस्या शासन दरबारी पोहचविल्या.
उमेश कांबळे यांची प्रसिद्ध प्रमुख म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली. पत्रकारीता क्षेत्रात मागिल १४ वर्षापासून कार्यरत आहेत तसेच सृजन मांढरे यांची कार्यकारणी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कासाठी लढणारे शासनमान्य राष्ट्रीय पुरोगामी संघात सामील होण्यासाठी अध्यक्ष प्रविण चिमुरकर यांनी आवाहन केले आहे.