पोटेगांव येथे बुध्द विहाराचे भुमीपुजन… — माजी मंत्री वडेट्टीवार व खासदार कवाडे यांची उपस्थिती…

ऋषी सहारे

संपादक

          गडचिरोली _ भिमज्योती नवयुवक बहुउदेशीय मंडळ पोटेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ‘ राजुली रोड ‘ पोटेगांव येथे दि . २२ मे २०२३ दुपारी १२ वाजता बुद्ध विहाराच्या जागेची पायाभरणी व भुमीपुजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचा भुमीपुजन सोहळा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टिवार व पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष लॉग मार्च प्रणेते ‘ धडाडीचे नेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी , माजी जि. प . सदस्य राम मेश्राम , रिपब्लिकन चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , अभारिप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत,शेट्युल कॉस्ट फेडरेशनचे चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड विनय बांबोळे , गोंगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शामकांत मडावी , पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , पिरिपाचे नेते अँड. अनंता उंदिरवाडे , विनोद मडावी ,रिपाई नेते उतम गेडाम सावली, शिध्दार्थ गोवर्धन आदि लाभणार आहेत . तरी बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज मंडळ पोटेगाव यांनी केलेले आहे .