पारशिवनी :-कन्हान वेगाने जाणाऱ्या कारचालकाने गाय ला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारा भरधावा कंटेनर क्रमाक यु के०४, सी बी ४८१५ हा कार क्रमांक एम एच४९ बी बी४०१८ वर आदळला . यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही . मात्र , कारच्या मागील भागाचे नुकसान खुब झाले . ही घटना नागपूर जबलपूर महामार्गावरील टेकाडी शिवारात रायल गैलेक्सी हाटेल समोर शनिवारी ( दि . १० ) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
पोलिस सुत्रा व्दारे प्राप्त माहितीनुसार , जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या डैंसटन गो कंपनी ची कार ( एम एच ४ ९ / बीबी ४०१० च्या अचानक गाय आडवी आल्याने समोर चालकाने ब्रेक लावले . अशातच मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणारे कंटेनर क्रमांक यु के ०४ सी बी ४८१५ नी कार ला मागून धडक लागली . या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती . घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोली मदत केंद्राचे उपनिरीक्षक मो तौफीक अन्सारी , शैलेश बिनझ यांनी घटनास्थळ गाठून वाहतू सुरळीत केली .
घटने ची माहीती कन्हान पोलीसाना कार चे चालक अमित रमेश कावळे यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली या वरून पोलिसी अपराध कम्राक ५२३/२२ नो गुन्हा नोंद करून कंटेनर क्रम्यक यु के ०४ सी बी ४८१५ च्या चालकाच्या विरोधात कलम २७९,१७७,१८४,३४ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलिस हवालदार गणेश पाल करित आहे.