सावली (सुधाकर दुधे)

 

      कुपोषणाचे प्रमाण कमी करणे , मुलींच्या जन्माचे स्वागत करणे , अंगणवाडीच्या माध्यमातून समाजात आहार , आरोग्य व स्वच्छता हा संदेश घरोघरी पोहोचविण्याच्या उद्देशाने शासन पोषण महाअभियान राबवित आहे . . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावली अंतर्गत लोंढोली सर्कलमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण महाअभियानाची सुरुवात करण्यात आली आहे . साखरी येथील अंगणवाडी केंद्रात या उपक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार चांदेकर, साखरी चे उपसरपंच दादाजी कीनेकर उपस्थित होते यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका पद्मा मोहूर्ले यांनी महिला व बालकल्याण मंत्रालायमार्फत १ते३०सप्टेंबर हा महिला पोषण महाअभियान म्हणून शासन राबवत असून यात महिला व त्यांचे आरोग्य ,कुपोषण ,शिक्षण तसेच गरोदर स्तनदा माता आणि मुले यानी आपल्या आरोगयाची काळजी कशाप्रकारे घ्यावी आणि आहार ,स्वच्छता ,लसीकरण यामुळे आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले.

        यावेडी आहार प्रदर्शनात गरोदर मातेला आपली व होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यावी याचे आहार प्रात्यक्षिक करून दाखविन्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक पर्यवेक्षिका पद्मा मोहूर्ले यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन नीलिमा भुरसे तर आभार वैशाली उराडे यांनी मानले.

  

कोट 

सावली प्रकल्प अंतर्गत१७०अंगणवाडी केंद्रात पोषण महाभियान राबविण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने कुपोशनाचे प्रमाण कमी होण्यावर भर दिला जात आहे तसेच आरोग्य ,स्वच्छता व लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी 

      प्रमोद जोनमवार

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com