कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी : – तालुक्यातिल बनपुरी गाव येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डि जे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत येत असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जवळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडविल्याने खाली पडुन तिघेही पंपकडे पळत असताना कल्पेश बावनकुळे ला पकडुन धारदार शस्त्राने मारून ठार करून आरोपी पळुन गेले. तर मागे स्वार दोघे मित्र पंप वर गेल्याने सुखरूप बचावले.
शनिवार (दि.१०) सप्टेंबर २०२२ ला नागपुर येथील गणेश विसर्जनात डि जे वाजवुन डिजे मालक कल्पेश भगवान बावनकुळे वय ३० वर्ष व डिजे ऑपरेटर सुरज सुनिल ढोबळे वय २२ वर्ष व हेल्पर जितेंद्र रमेश ढोबळे वय २४ वर्ष तिघेही राहणार गांव बनपुरी. ता पारशिवनी हे नागपुर वरून रात्री ११.३० वाजता बनपुरी गावी घरी परत दुचाकी क्र एम एच ४९ बी एल ५६२८ अँक्टीव्हा दुचाकी ने येत असताना कल्पेश बावनकुळे हे दुचाकी चालवित असुन दोघे आपरेटर व हेल्पर मागे बसले होते. कन्हान वरुन बोरडा रोडने जात असताना बोरडा रोडवरील पंप च्या सामोर थोडया अंतरावर शनिवार चे रात्री १२.३० वाजता दरम्यान दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडविल्याने दुचाकीसह तिघेही खाली पडले व जिव वाचवुन पंप कडे पळताना दोन्ही आरोपीने कल्पेश बावनकुळे ला पकडुन धारदार शस्त्राने मारून ठार करून आरोपी पळुन गेले. तर मागे स्वार दोघे आपरेटर सुरज व हेल्पर जितेंद्र हे पंप वरील कर्मया-यासह घटनास्थळी जावुव पाहीले तर कल्पेश रक्तबंबाळ मृत अवस्थेत जमिनीवर पडला दिसल्याने घटनेची माहीती कन्हान पोलीस स्टेशन ला बनपुरी गावात सांगितल्याने घटनास्थळी पोलिस हवालदार नरेश वरकडे पो ना वैभव बोरबले , कोमल खैरे पोलीसानी पोहचुन तपास सुरू केला. दोघे पंप वर धावत गेल्याने सुखरूप बचावले तर दोन अज्ञात आरोपीने कल्पेश बावनकुळे ला धारदार शस्त्राने मारून जिवानिशी ठार केल्याने कन्हान पोलीसानी अप क्र ५२५/२२ कलम ३४१, ३०२, ३४ भादंवी गुन्हा नोंद करण्यात आला असुन
बातमी लिहे पर्यंत घटनेचे कारण कळु शकले नाही.