दिक्षा कऱ्हाडे
संपादिका
या वर्षीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप शेतीमालाच्या नुकसान संबंधाने शासन स्तरावरावरुन शेतकऱ्यांना हेक्टरी नेमके किती रुपये दिले जाणार?व केव्हा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करणार?हे कोळे महाराष्ट्र शासनाला व संबंधित महशूल विभागाला माहिती असणार!.मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी किती रुपये मिळणार?यासंबंधाने अजूनही शेतकऱ्यांना निश्चित माहिती नाही.
गोपनीय माहिती नुसार हेक्टरी सरासरी ३३ टक्के नुकसान भरपाई देण्यासंबंधाने सर्वे करण्याचे आदेश शासन स्तरावरावरुन संबंधित प्रशासनाला देण्यात आले होते.
३३ टक्के शेतमाल नुकसान भरपाई प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत महाराष्ट्र शासन स्तरावरावरुन देण्यात आली तर शेतकऱ्यांना केवळ ४ हजार रुपये हेक्टरी मिळणार एवढे पक्के आहे.
तद्वतच शेतमाल नुकसान संबंधाने हेक्टरी सरासरी ३३ टक्के नुकसान प्रशासकीय स्तरावरुन दाखवले गेले असेल तर फक्त ४ हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार!.अन्यथा ४ हजार रुपये पेक्षाही कमी रुपये शेतकऱ्यांच्या माथ्यावर शासन मारणार असल्याचे संकेत आहेत.
शेतकऱ्यांना शेतमाल नुकसान भरपाई,हेक्टरी १३ हजार रुपये देणार,अशा प्रकारचा गवगवा महाराष्ट्र शासनाने केला असला तरी सरासरी शंभर टक्के नुकसान भरपाई प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार रुपये मिळणार?हे म्हणणे बरोबर ठरणारे नाही..