शेतकऱ्याचा मुलगा बनवतोय वर्ध्यात सिनेमा… — ग्रामीण भागातील मुलीच्या संघर्षावर आधारित…

         रोहन आदेवार 

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधि वर्धा 

          वर्धा : जिल्ह्यात एक नवीन चित्रपट निर्मिती सुरू होणार आहे. ज्याची संपूर्ण कथा ग्रामीण भागातील एका मुलीच्या संघर्षावर आधारित आहे. शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या या मुलीच्या कहाणीला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल आणि सुमारे २० दिवस चालणार आहे.

            चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आदेश ढगे यांनी काल वर्ध्यातील तरुणांसोबत बैठक घेतली आणि या प्रकल्पाबद्दल चर्चा केली. या बैठकीत तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी चित्रपटात काम करण्यास आणि सहाय्यक भूमिकांमध्ये सहभाग घेण्याची उत्सुकता दर्शवली.

            आदेश ढगे यांनी सांगितले की,या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील मुलींच्या संघर्षांना आणि त्यांच्या शिक्षणासाठीच्या प्रवासाला प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्ध्यातील तरुणांची ऊर्जा आणि योगदान या प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

वर्ध्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण

           या चित्रपटाच्या निर्मितीमुळे वर्ध्यातील तरुणांना एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. चित्रपट निर्मितीतून त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल आणि त्यांना त्यांच्या कला आणि सर्जनशीलतेला व्यक्त करण्याची संधी मिळेल.

             वर्ध्यातील या प्रकल्पामुळे स्थानिक चित्रपट निर्मितीला एक नवीन चालना मिळाली आहे. आणि स्थानिक कलाकारांना आपले कौशल्य दाखवण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

               या बैठकीत मनीष चौधरी, प्रणव, युगल राखुंडे, शुभम सोलंके, प्रतीक येसंकर, सिद्धार्थ सोमकुवार, सुमित जरुंडे, कृष्णा नंदुरकर, आयुष राईकवार , वेदांत बावनकर, अमन लाडके, पार्थ धरणे, तेजस्वी लोहकरे, प्रज्वल उईके , आर्यन मडावी, हूनेन अली, अभि किलैकर, सोहेल अन्सारी उपस्थित होते.