केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 13 जुलैला अमरावती शहरात,बिसनजी बनसोड यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात उपस्थिती दर्शविणार…

 युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक 

         रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दि 13 जुलै 2024 शनिवार रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश बनसोड यांचे वडील विसनजी बनसोड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात ओमप्रकाश बनसोड यांच्या राहत्या घरी नया अकोला येथे 12 वाजता उपस्थित राहणार आहेत.

          त्यांच्या समवेत पक्षाचे जिल्हा समन्वयक महेंद्र भालेकर माजी नगरसेवक प्रकाश बनसोड प्रा.डॉ.प्रदीप दंदे हे उपस्थित राहणार आहेत.

          तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा तालुका व शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आरपीआयचे शहराध्यक्ष मनोहर घोडेस्वार यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.