मजरा येथील कॅन्सर ग्रस्त रुग्णास डॉ.सतिश वारजुकर यांचे कडून आर्थिक मदत…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

        चिमूर तालुक्यातील मौजा मजरा येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वय चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांच्या तर्फे चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे यांच्या हस्ते सदर मदत देण्यात आली.

        सविस्तर वृत्त असे की,मौजा.मजरा येथील विजय मेश्राम वय हे भूमिहीन शेतमजूर व कुटुंब प्रमुख आहेत मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

          वारंवार तब्येत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले.पुढील उपचारासाठी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूरला गेले असता काही महिन्यानंतर पुन्हा त्यांना कॅन्सरचा त्रास सुरु झाला.

         घरातील प्रमुख व्यक्तीवर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली,त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती डॉ.सतिश वारजुकर यांना दिली असता त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. आर्थिक मदत देताना माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमोद गौरकर,मनोज राने,उपस्थित होते.