कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेल प्रदेश प्रमुख डॉ. हेमंत सोनारे यांचा आदेशाने आज नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या जिल्हाप्रमुख पदी प्रशांत बाजीराव मसार यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती बद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मलिकार्जून खरगे,लोकसभेचे विरोधी पक्षनेते ना.राहुल गांधी,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले,श्री.हेंमत सोणारे,माजी मंत्री श्री.सुनील केदार,माजी मंत्री श्री.राजेन्द्र मूळक यांचे आभार प्रशांत मसार मानले आहे.
पक्षश्रेष्ठींनी माझावर पक्षनिष्ठा व सामाजिक कार्यावर जो विश्वास दाखविला त्यावर संघटनात्मक चांगले काम करून वास्तव्यावर उतरण्याचा प्रयत्न करील असे त्यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी कडुजी,शेषराव बोबडे,आकाश महातो,दिपक तिवाडे,प्रदिप नाटकर,देवचद काळे,सूरज डफ आदी उपस्थित होते.