आझाद समाज पक्षाची गडचिरोली मध्ये ओपनिंग… — पक्षाचा 13 ला पदग्रहण सोहळा…

ऋषी सहारे 

  संपादक

       गडचिरोली : नुकताच लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मध्ये नगीना क्षेत्रातून निवडून आलेले भिम आर्मी चीफ ॲड. चंद्रशेखर रावण यांच्या आझाद समाज पार्टीचा पदग्रहण व पक्ष बांधणी सोहळा गडचिरोली येथील फंक्शन हॉल येथे दुपारी 12 वाजता आयोजित केलेला आहे.

        या कार्यक्रमाला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अविनाश शांती, प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, प्रदेश प्रवक्ते ॲड. सुमित साबळे उपस्थित राहून पक्षाची ध्येय, धोरणे व आगामी निवडणुकीत पक्षाची भूमिका यावर मार्गदर्शन होणार आहे. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असून अध्यक्ष व इतर कार्यकारिणी नियुक्ती होणार आहे.

       खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांचे हात बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद मडावी, राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, पुरुषोत्तम रामटेके, नागसेन खोब्रागडे, प्रितेश अंबादे, तारका जांभुळकर, शोभा खोब्रागडे, पवन माटे, प्रकाश बन्सोड, प्रतीक डांगे आदींनी केले आहे.