आदिवासी अतिक्रमण धारकांना शेतजमिनीचे तात्काळ पट्टे मिळावे म्हणून खासदार यांना निवेदन..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

            पारशिवनी तालुका अंतर्गत येत असलेले अति आदिवासी दुर्गम भागातील गावे नरहर,ढवळापुर,बनेरा,कोलीतमारा या गावातील अतिक्रम धारकांचे जमिनीचे पट्टे जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडे मंजूर झालेले असून आत्तापर्यंत त्यांना ते पट्टे देण्यात आले नाही.यामुळे खासदार श्री.शामकुमार बर्वे यांना निवेदन देण्यात आले व सदर प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली.

     पारशिवनी टालुक्यातील माहुली जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेले अतिआदिवासी दुर्गम भागातील गावे नरहर,ढवळापुर,बनेरा,कोलीतमारा या गावातील अतिक्रम धारकांचे जमिनीचे पट्टे जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडे मंजूर असून आत्तापर्यंत त्यांना ते पट्टे देण्यात आले नाही.

            यामुळे गुरुवार दि.11/7/2024 रोजी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.श्याम कुमार बर्वे रामटेक लोकसभा व माजी अध्यक्ष रश्मिताई बर्वे यांच्या निवासस्थानी पिढीत आदिवासी शेतकऱ्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर करण्यात आले.

        खासदार रामकुमार बर्वे यांना निवेदन देताना,ढवलापुरचे माजी सरपंच प्रिती मडावी,श्री.मिथुनजी उईके व सर्व अतिक्रमण धारक पिढीत शेतकरी श्री.अशोक उईके,अंकुश ईनवाते,श्री.गनुजी ईनवाते,सौ.मुन्नी ताई अडमाची,सोपचनजी इनवाते,श्री. विश्वनाथ इनवाते,दिलीप उईके,श्री. सुनील भलावी,श्री.शेखरजी इनवाते व आदी सर्व अतिक्रमण धारक शेतकरी निवेदन देते वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.