तालुका विधी सेवा समिती दर्यापूर तर्फे प्रबोधन महाविद्यालयात दर्यापूर,येथे कायदेविषयक शिबिर…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्यातील नामांकित प्रबोधन क.महाविद्यालय दर्यापूर येथे दि 11जुलै रोजी तालुका विधी सेवा समिती दर्यापूर यांच्यावतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

         या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ए आर यादव सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर, दर्यापूर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनात अभ्यासाला किती महत्व आहे.संविधानाने दिलेले अधिकार व कायदे आपल्या हितासाठी कसे कार्य करतात यावर विस्तृत मार्गदर्शन केले.

        देशमुख सहदिवानी न्यायधिश कनिष्ठ स्तर दर्यापूर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी असलेले कायदे तसेच मोबाईल चां दुरुपयोग कसा केला जातो आपल्या आजूबाजूला जर विद्यार्थी तसेच बालकांचे लैंगिक शोषण होत असल्यास काय करायला पाहिजे तसेच नवीन कायदा कसा आपल्यासाठी हितावह आहे यावर मार्गदर्शन केले.

         अधिवक्ता विद्यासागर वानखडे यांनी बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण यावर विचार मांडले यासह सामाजिक जीवन जगत असताना असंख्य अडचणींचा सामना हा सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असतो.

         परंतु कायद्यासमोर सर्व समान या हेतूने बऱ्याच अपरिहार्य घटनांना आळा बसला आहे हे वास्तविक सत्य विद्यार्थ्यांपुढे मांडले तसेच विद्यार्थी यांना चांगला व वाईट स्पर्श व बालकांचे लैंगिक शोषनापासून संरक्षण कायदा 2012 व समाजात सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुद्धा विशेष मार्गदर्शन व जनजागृती यावेळी करण्यात आली.

          तसेच या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ओ एस पाटील दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दर्यापूर प्रमुख उपस्थतीमध्ये ए आर.यादव सह दिवानी न्यायाधिश क स्तर दर्यापूर देशमुख यांच्यासह दिवाणी न्यायाधीश क. स्तर दर्यापूर तसेच ॲड.धर्मपाल वाघमारे ॲड.मुकुंद नळकांडे,कार्यालयीन कर्मचारी वैभव ताथोड , प्राचार्य संत. डोळे,गोंडाने क.महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी गण बहुसंख्येने उपस्थित होते.