21 ते 30 वर्षाच्या वयात प्रत्येक युवक – युवती, द्वितीय आणि तृतीयपंथी पिढी या काळात गेल्या 20 वर्षातील निसर्गनियमावर आधारित झालेल्या सूसंस्कारानुसार आपल्या भावी जीवनाचे ध्येय निवडण्यासाठी शिक्षणाच्या खऱ्या व्याख्येनुसार शिक्षण घेऊन वैचारिक प्रगल्भता परिपक्व करतो. त्यासाठी आई- वडिलांच्या अनुवांशिकतेचा 20% प्रभाव निसर्गता असतोच.शिवाय स्वतःच्या बौद्धिक कौशल्याने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून आणि सामाजिक वातावरणातून जीवन ध्येयाकडे जाण्याचा मार्ग स्वतःच शोधतो.
त्यासाठी जगातील ज्ञात -अज्ञात,महापुरुष आणि तत्ववेत्त्यांच्या चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श डोळ्यासमोर जिवंत उदाहरणे ठेऊन तसेच सामाजिक भान कर्तव्यातून सिद्ध करण्यासाठी परिपक्व होऊन अमलात आणतो. जेणेकरून याचा हा आदर्श शिक्षण + सुसंस्कार यांचा मिलाफ होऊन आदर्श स्वावलंबी देशभक्त, आदर्श युवक निर्माण होऊन इतरांसाठी आदर्श ठरतो. अशी युवापिढी भावी भारताची नांदी ठरत असते.
परंतू,आजची 2024 ची भारतीय युवापिढी वरील व्याख्येनुसार गेल्या 20 वर्षातील सुसंस्कार न मिळाल्यामुळे किंवा केंद्र व राज्य सरकारांनी तसे प्रयत्न न केल्यामुळे किंवा आई वडिलांच्या हतबलतेमुळे तसे संस्कार न झाल्यामुळे आजची युवापिढी भयग्रस्त,मानसिक गोंधळात सापडली आहे.
त्यात मोबाईलने तर अजूनच भर टाकलेली आहे.अशा अवस्थेत आम्ही भावी उज्वल भारताची अपेक्षा कशी करणार?
31 ते 40 वर्षाच्या वयात प्रत्येक भारतीय नागरिक हा एक जबाबदार देशाचा नागरिक आणि कुटुंब प्रमुख अशी दोन कर्तव्य एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडत असतो. याच काळात खऱ्या शिक्षणाच्या व्याख्येनुसार सुसंस्कारीत शिक्षण घेऊन, त्याच आधारावर सम्यक आजीविकेच्या माध्यमातून सुशिक्षित होऊन स्वतःच्या कुटुंबाची ( पत्नी, मुले,आई,वडील,बहीण भाऊ ) सर्वप्रकारची सुरक्षित सुखाची जबाबदारी स्वीकारून कर्तव्यातून सिद्ध होतो.या काळात आपल्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेनुसार आपल्या कौशल्याच्या मदतीने आर्थिक उन्नती सुसंस्कारावर आधारित करत एक एक प्रगतीची पायरी ओलांडत पुढे पुढे जातो.
जेणेकरून या कुटुंबाचा आदर्श इतर कुटुंबे घेऊन संपूर्ण समाज आणि देश त्या दिशेने प्रगती करण्यास सुरुवात करतो. आणि हीच अपेक्षा आपण पूर्ण करावी हीच इच्छा संपूर्ण महापुरुष आणि तत्ववेत्त्यांची व आईवडीलांची असते.
परंतू,सरकार ( केंद्र व राज्य सरकारे ) मात्र वरीलप्रकारे देशातील व समाजातील सम्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाच्या 100% अंमलबजावणीचा आधार न घेतल्यामुळे नेमकी उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे.!
याच नागरिकांना सरकार महागाई,बेरोजगारीचे चटके देऊ देऊ आपल्या व्यवस्थेचे मानसिक गुलाम बनवून टाकले की, जेणेकरून यांनी कधीही सदविचारी न बनण्याची व्यवस्थाच करून टाकली.
म्हणून आमची भारतीय जनता मरता मरता जगते आहे आणि जगता जगता मरते आहे.
अशा अवस्थेत लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्याची अपेक्षा तरी करणार?
म्हणून आमच्या देशाला व युवापिढीला उज्वल भविष्य दिसत नाही.