कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :-पारशिवनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातंर्गत येणाऱ्या ग्राम बाबूळवाडा परीसरात दिंनाक १० जुलै बुधवारच्या रात्री ९ वाजता गुप्त माहितीच्या आधारे पारशिवनी पोलीसांनी सापळा रचून बाबुळवाडा परीसरात मोहफुलाची अवैध दारूची वाहतूक करणाऱे वाहन पकडले व आरोपींवर कारवाई केली.
जप्त केलेला माल- 1) दारू वाहतूकीस वापरलेली मारूती सुझुकी झेन गाडी क्रमांक MH.31,CN 6601 कि.1 लाख रूपये ,2) 04 नग प्लास्टीक ट्युब मध्ये प्रत्येकी ट्युबमध्ये 70 लीटर प्रमाणे एकुण 280 लिटर मोहफुल हातभट्टी दारु प्रती लिटर 50 रु प्रमाणे कि. 14 हजार रूपये असा एकुण किं.1 लाग 14, हजार रुपयेचा मुद्देमाल. जप्त करण्यात आला.
आरोपी – 1) करण उकंडराव मसराम 19 वर्ष रा.सावनेर, 2) सनकीलाल तुळशीराम तुमराम 28 वर्षरा.शिलादेवी,ता.पारशिवनी याना अटक करून पंचनाम्याप्रमाणे मुद्देमाल जप्त केले.
फिर्यादी PSI शिवाजी भताने पो.स्टे.पारशिवनी यांच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये डि.बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी भताने,सहायक फौजदार देवानंद उकेबोंद्रे,पोलीस हवालदार गजानन उकेबोंद्रे,पोलीस अंमलदार वीरेंद्र सिंग चौधरी,पो.हवा.राकेश बांधाटे,पृथ्वीराज चव्हाण,चालक सहायक फौजदार संदीप बेलेकर यांचे पथकाने यशस्वी कार्यवाही केली.