कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायतच्या सभागृहात दिनांक ११ जुलै रोज गुरुवारला कृषी विभागा तर्फे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास(RAD) घटकांच्या अंमलबजावणी बाबत बैठक घेण्यात आली.
यावेळी शेतकरी बांधवांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शालिनीताई नंदलाल बावनकुळे (सरपंच, बनपुरी) तसेच उपसरपंच श्री. रुपेश कोठेराम ढोबळे व ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रम स्थळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता पारशिवनी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री.राजकमल दहात… मंडळ कृषी अधिकारी विभाग कन्हान श्री प्रभाकर शिरपूरकर,मंडळ कृषी अधिकारी पारशिवनी जगदीश भालेराव,यांनी व इतरांनी विशेष दक्षता घेतली होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक विवेकानंद शिंदे कृषी सहायक व कार्यक्रमचं आयोजक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेषा शेतकरी बांधवांना अधोरेखित करून सांगितलीं,या प्रसंगी जे.बी.भालेराव पारशिवनी मंडळ कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमा बाबत इतंभूतपणे शेतकरी बांधवांना विविध विषयांवर माहिती समजावून सांगितली.
तालुका कृषी अधिकारी राजकमल दहाट यांनी शेतकरी बांधवांना पिक विमा योजनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
निलेश क्षेत्राचे सहाय्यक कृषी श्री. विवेकानंद शिंदे यांनी संपूर्ण योजनांची ईतंबूत माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे शेतकरी बांधवांना आव्हान केले व कोरडवाहू क्षेत्र विकासाच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले…
उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार कन्हान मंडळ कृषी अधिकारी पी.डी शिरपूरकर यांनी व्यक्त केले.यावेळेस सभेत उपस्थित बनपुरी येथील श्री.ईश्वर ढोबळे,मोरेश्वर पाटील,कृष्णा सावरकर,ईश्वर देशमुख,प्रभाकर बावनकुळे,अक्षय ढोबळे,कवडू अंबागडे,उत्तम मेश्राम,गोविंदा देशमुख,संतोष चौरे,महादेव वाघाडे,तस्वीर बावनकुळे,प्रमोद गावडे, इत्यादी, बहुसंख्य शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते.
श्रीमती शांतीताई बावनकुळे सरपंच बनपुरी यांच्या अध्यक्षीय भाषणांने कार्यक्रमाची सांगता झाली..