दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

 

बल्लारपुर:रोटरी क्लब ही बल्लारपुर शहरातील विविध सामाजिक कार्यक्रम राबवून जनसामान्यांचे निस्वार्थ सेवा करणारी संस्था आहे.आज या स्ंस्थेच्या वतिन हीच परंपरा पुढे नेण्याकरिता सण २०२२-२३ करिता नव्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण सोहळा,माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा व राजेश पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत व रोटरी क्लबचे निवर्तमान अध्यक्ष मनीष मूलचंदानी, सचिव उमेश पटेल,याच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल चरपे,सचिव महेश कायरकर यांचा पदग्रहन करवित पुढील जवाबदारी सोपविण्यात आली.व त्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य प्रशांत दोंतुलवार,अजय वासलवार, प्रशांत भोरे,वैभव मेनेवार,राजू मुंदडा,विक्रम पंडित,उत्तम पटेल,राहुल वरु इत्यादी सदस्य उपस्थित होते. तसेच पत्रकार बांधव ज्ञानेन्द्र आर्य,श्रीनिवास कंदिकुरी,घनष्याम बुरडकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन निलेश चिमड्यालवार यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News