युवराज डोंगरे/खल्लार

 दर्यापूर येथील एकविरा शाळेमधील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या शुभ दिवसावर पालखी काढत पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणीचे साक्षात दर्शन दिले चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणींची वेशभूषा परिधान करत तसेच तुळशी वृंदावन व भगवे झेंडे मिरवत अप्रतिम शोभनीय देखावा मुलांनी तयार केला होता टाळ मृदंग ढोलकाच्या गजरात मुलांनी शाळेला प्रदक्षिणा मारली त्यामुळे शालेय परिसर हा चिमुकल्यांच्या हरिभजनाने दुमदुमून गेला होता चिमुकल्यांनी पालखी सोहळ्याचे आयोजन करताच वरून राजाने आपली उपस्थिती यावेळी प्रार्थनीय ठेवली सदर स्तुत्य उपक्रम एकविरा शाळेच्या प्रायमरी शिक्षकांनी आयोजित करत मुलांची वेशभूषा सुद्धा तयार करून दिली तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याला आज विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये शाळेत पाठविले होते यावेळी उपस्थित एकविरा शाळेच्या प्राचार्या उज्वला गायकवाड यांनी पालखीला हिरवी झेंडी देऊन पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला चिमुकल्यांच्या पालखी सोहळा आयोजनाचे विश्वस्त मंडळांनी अभिनंदन केले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com