वणी : परशुराम पोटे

 

वणी नगर पालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असुन आता शहरात न येणाऱ्या वृत्त पत्रात जाहिरात दिल्यामुळे चर्चा रंगली आहे.

चार दिवसांआधी म्हणजे दि.७ जुलै ला पाणी पुरवठा विभागातील कामांची निविदा मागविण्यासाठी यवतमाळ येथिल एका सांध्य दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्या दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्या दैनिकाचा वणी शहरात प्रतिनिधि किंवा एजंट नाही. शहरात न येणाऱ्या वृत्तपत्रात जाहिरात दिली तरी कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून यात काही शटींग तर नाही ना? अशी ही चर्चा रंगु लागली आहे.

 उपमुख्यधिकारी खुषाल भोंगळे यांच्याकडे न.प.च्या विविध विभागाच्या कामांची निविदा मागविण्यासाठी रोटेशन प्रमाणे जाहिरात देण्याचे काम आहे. परंतु रोटेशन प्रमाणे जाहिरात न देता चहापाण्याच्या भेटीत असणाऱ्या काही मोजक्या प्रतिनिधींनाच जाहिरातींचा लाभ मिळत असल्याचे एका प्रकरणातुन दिसून आले आहे.

 दि.१७ जुन २०२२ रोजी जलपुर्ती विभागातील एक जाहिरात एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. तिच जाहिरात आणि त्याच प्रतिनिधीला दि.६ जुलै २०२२ रोजी पुन्हा देण्यात आली आहे. एकीकडे रोस्टर प्रमाणे जाहिरात देण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एकाच प्रतिनिधी ला अनेकदा जाहिराती चा लाभ देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी चौकशी केल्यास उप मुख्यधिकाऱ्यांचा मनमानी कारभार दिसून येईल, असे वृत्त पत्रांच्या प्रतिनिधी मधुन बोलले जात आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी स्टेशनरीची जाहिरातही परस्पर देण्यात आली असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून उप मुख्यधिकाऱ्यांकडुन जाहिरात वाटपाचे काम काढण्यात यावे, व रोटेशन प्रमाणे जाहिरात मिळावी अशी मागणी वृत्त पत्र्याच्या प्रतिनिधी कडुन होत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com