दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

 

चंद्रपूर – संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी सुरु असलेली डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

      डेंग्यु प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे २६५ रुग्ण मनपा हद्दीत आढळुन आले होते. मागील वर्षी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आयुक्त श्री.राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात या मोहिमेत मनपाने नेमलेले २५ ब्रिडींग चेकर्स, ३५ एएनएम, ७ एमपीडब्लु व १२८ आशा वर्कर प्रत्यक्ष सहभागी आहेत.तसेच स्वच्छता निरीक्षक यांचाही सहभाग आहे.

   कंटेनर सर्वे मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घरांची तपासणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन यात ५ टक्के घरे दुषित आढळली आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा २५० घरांची रोज तपासणी केली जात आहे. दुसऱ्या तपासणीत जर पुन्हा तीच घरे दुषित आढळली तर त्यांना नोटीस देऊन दंडीत केले जाणार आहे.    

     शहरात मागील काही दिवसांपासुन संततधार पाऊस सुरु आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com