रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ/वर्धा
मारेगाव: गुरुपौर्णिमे निमित्य मारेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जगन्नाथ महाराज मंदिर येथे साई मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज रक्तपेढी यवतमाळ यांची टीम रक्तदान घेनार आहे.
नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले मारेगाव येथील साई मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून “गुरुपौर्णिमा उत्सव” साजरा करण्यात येते. या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते 5 वाजता पर्यंत भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तर बुधवार ला सायंकाळी 5 वाजता महाप्रसाद वाटपाचे व भव्य शोभा याञेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या रक्तदान शिबिरात परिसरातील तमाम रक्तदात्यांनी सहभागी होवुन रक्तदान करावे असे आवाहन साई मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मागील वर्षी 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
“साई मित्र परिवार सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर ”
“शहरात नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या “साई मित्र परिवार”तर्फ गेल्या 10 वर्षा पासून सतत रक्तदान शिबिर घेवुन शेकडोंना रक्ताची मदत करून अनेकांना जीवनदान दिले. कोरोना काळात हाताला काम नसलेल्या लोकांचे खाण्याचे वांदे झाले होते.
अश्या गरजवंताना साई मित्र परिवार
मारेगाव च्या वतीने किराणा साहित्य वाटप
करण्यात आले होते तर 100 ते 150
जेवणाचे टिफिन डब्बे शहरात आणि
ग्रामीण भागात सुद्धा “एक हात मदतीचा”
हा उपक्रम राबविल्या गेला आहे.