वणी :- परशुराम पोटे
कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून मंदिरे बंद असल्याने, कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाही.
मात्र यावर्षी श्री साईसेवा समिती वणीच्या वतीने गुरूपौर्णिमेला साई मंदिर यवतमाळ रोड वणी येथे १२ व १३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी १२ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता जनकराज महाराज अकोला द्वारा प्रस्तुत श्री साई जगराता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवारी १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जनकराज महाराज अकोला यांचे हस्ते महाआरती व महाप्रसाद, दुपारी ५ वाजता श्रीची पालखी व शोभायात्रा,१४ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता दहिहंडी व काला इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी साई भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री साई समिती,साई मंदिर यवतमाळ रोड वणी यांनी केले आहे.