उपसंपादक/ अशोक खंडारे
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्याचे अध्यक्ष हंसराज उंदिरवाडे होते प्रमुख मार्गदर्शक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोबरागडे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर आदि मान्यवर उपस्थित होते
रिपब्लिकन पक्ष म्हणजेच चळवळ असून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विच्यार व बॅरीस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून चळवळ तेवत ठेवणे, संगठन मजबूत करणे, महागाई च्या विरोधात मोठे आंदोलन करणे, निवडणूका लढविण्यासाठी रिपब्लिकन चे सर्व गट एकत्र येऊन लढणार असल्याचे प्रमुख मार्गदर्शक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोबरागडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, यांनी मत व्यक्त केले.
सदर कार्यकर्ता मेळाव्यात पत्रूजी भैसारे, दिवाकर उंदिरवाडे, देवेंद्र बांबोळे, मुनेश्वर गायकवाड, रमेश शेन्डे, जिवनदास सहारे अभय भटकर, संगिता बोदेले, गिता कोडाप, उत्कर्षा आत्राम, ललिता हर्षे, गिता सहारे यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश घेतला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोबरागडे यांनी सर्वाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी प्रतीक डोर्लीकर राष्ट्रीय कोषाध्यक्ष, प्रदीप भैसारे गडचिरोली विधान सभा क्षेत्र प्रभारी ,निताताई सहारे जिल्हाध्यक्षा महीला आघाडी, नरेंद्र रायपुरे जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, पुनेश्वर वड्डे अध्यक्ष आदिवासी आघाडी, तैलेश बांबोडे जिल्हा उपाध्यक्ष, डाॅ हरिदास नंदेश्वर जिल्हा उपाध्यक्ष दुर्योधन सहारे जिल्हा उपाध्यक्ष, अशोक खोब्रागडे कार्यालयीन सचीव, ज्योती उंदिरवाडे जि.सरचिटणीस महीला आघाडी, विशाल अलोणे, राजाभाऊ खोबरागडे, महादेव कांबळे, पुन्यवाण सोरते सरचिटणीस युवक आघाडी, प्रल्हाद रायपुरे अध्यक्ष गडचिरोली तालूका, पुंजाराम जांभूळकर सचीव गडचिरोली तालूका, विशालशिंग परीहार उपाध्यक्ष धानोरा, विजय देवतळे सह सचीव, चंद्रभान राऊत, नारायण साखरे, भानुदास बांबोडे, गिरीधर बारसागडे, सुरेंद्र गेडाम, रामदास राऊत, अरूण सेकृतीवार, गेंदाताई गोडबोले, नरेश वाळके,सुभाषराव बावणे ईत्तर पदाधिकारी व, कार्यकर्ते धुवांधार पाऊस सुरू असतांना सुद्धा उपस्थित होते
कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, संचालन सरचिटणीस विद्यार्थी संघटना धर्मेंद्र वंजारे तर आभार महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुरेखाताई बारसागडे यांनी मानले.