दिनेश बनकर कार्यकारी

संपादक दखल नुज भारत

7822082216

गडचिरोली:-आम आदमी पार्टी गडचीरोली येथिल कार्यकर्त्यांनी स्थानिक वैभव हाॅटेल येथे एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वानूमते विजदरवाढ विरोधात राज्यव्यपि आंदोलन यशस्वी करनण्याचे ठरविण्यात आले आहे. महागाईमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रात नव्याने सत्तेतवर असलेल्या सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारच्या या जनविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टिने बुधवार दिनांक १३/७/२०२२ रोजी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होन्याचा निर्नय घेतला आहे. सत्तेत येणारे सरकार जनतेला खोटे आश्वासन देत आहे. मात्र आम आदमी पार्टी दिल्ली पंजाब मध्ये जनतेच्या आस्वासनाची पूरतः करत असून जनतेला २०० युनिट प्रति महिना वीज मोफत देत आहे. त्यामूळे दिल्लीतील ७२% जनतेला विज बिल शुन्य येते. तसेच पंजाब मधील जनतेला १ जुलै २०२२ पासून ३०० युनिट वीज मोफत देन्याचे आस्वासन पूर्ण केले आहे.परंतू महाराष्ट्रात

सरकारला अडीच रुपय युनिटला मिळणारी विज १० ते १५ रुपये युनिट विकनारे सावकारी सरकार आहे. आता या सावकारी सरकारच्या विजदरवाढ विरोधात आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. सर्व आम जनतेला आवहान करन्यात येत आहे की दिनांक १३/७/२०२२ रोजी जनहीतार्थ आंदोलनामध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन विज दरवाढीचा विरोध करावा. या बैठकिला खालिल प्रमाणे पदाधिकारी हजर होते. जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शहर संयोजक कैलास शर्मा,शहर सह संयोजक रुपेश सावसाकडे,शहर कमेटि सचिव संतोष कोटकर, संयोजक अलका गजबे,शहर महिला संयोजक समिता गेडाम, महिला सचिव मिनाक्षी खरवडे, युवा सयोजक सोनल नन्नावरे,युवा सचिव नामदेव पोले इत्यादी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com