पारशिवनी:- पेंच पाटबंधारे उपविभागीय अभियंता एन एस सावरकर पारशिवनी व तहसील कार्यालयामार्फत तहसीलदार प्रशांत सागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पेच प्रकल्प नवेगाव खैरी येथील नैसर्गिक हरकती निपटारा कायदा 2005 नुसार धरण काठावरील 21 गावांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते, अशी माहिती पेच पाटबंधारे विभागाचे उपविभागिय अभियंता यांनी दिली. उपविभागीय अभियंता श्री.एन.एस.सावरकर व तहसीलदार प्रशांत सागडे यांनी धरण काठावरील 21 गावातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
पेचप्रकल्प नवेगाव खैरी प्रकल्प, पुर नियंत्रण कक्ष व तहसील कार्यालय पारशिवनी पुर नियंत्रण कक्षात मिळालेल्या माहितीनुसार, पेचप्रकल्प नवेगाव खैरी येथे एकूण ३२५ मीटर म्हणजेच १४१.९८४ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून आज दि.१०जुलै २०२२ रोजी 126. 51 द ल घ मीटर पाण्याची आवक झाली असून 82.06% पाणीसाठा झाला आहे, पाणी साचत राहिल्यास आणि 85.00% पाणी साचत राहिल्यास आज रात्री केव्हाही पेच नदीत पाणी सोडावे लागू शकते, तर पाटबंधारे विभाग व तहसीलच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार सर्व नियमांनुसार सर्व गावांना मे दवंडी नुसार माहिती देण्यात आली आहे.
पेच नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यासाठी, अशी माहिती देण्यात आली. तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले.तर आज दिनांक १० जुलै रोजी कुसूमधरा. सुवरधरा परिसरात मुसळधार पावसामुळे क्षेत्रातील नाले व नद्या दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे पुराचा इतर गावाना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.