रमेश बामणकर
अहेरी तालुका प्रतिनिधि
दि. १० मे २०२३
नई दिल्ली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शीलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी जी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी भेट घेत गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे उपस्थितीत होते.