रमेश बामणकर
अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी – जिल्हयातील अतिदुर्गम भागात रस्त्याच्या बांधकामासंबंधी कोटींची कामे मंजूर करून घेणे व रस्त्यांचे कामे थातूरमातूर करून कोट्यावधी पैसा कमविण्याचा धंदा सुरू केल्याने प्रणय खुनेवर अनेक वन गुन्हे दाखल आहेत. भामरागड, एटापल्ली व पिरमीली परिसरातील पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अनेक रोड वर रोड साईट बिम मध्ये मुरूम ऐवजी रस्त्यालगत ची माती वनकायद्याचा भंग करत नाली खोदुन माती टाकण्यात आली आहे, त्यामुळे हा मार्ग पावसाळ्यात एक महिना तरी ठिकणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गावातील व गाव आजूबाजूच्या नागरिकांना उखडलेले रस्तेच नशिबी असणार आहे. मार्ग निकृष्ट दर्जाचे बनविल्याने या परिसरातील कुपोषीत बालके, गरोदर माता, बाळंत माता वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तसेच जिल्हा परिषद चे शाळकरी विध्यार्थी शाळेत व इतर कामाकरिता जाण्यासाठी जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष प्रवण खुणे यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावे म्हणून भामरागडचे उपवनसंरक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिका-या कडे निवेदनाद्वारे आदी बाबींची मागणी भ्रष्ट्राचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताडीकोंडावार यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले कि, दिनांक 09 मे 2023 रोजीचे लोकमत तसेच इतर वृत्तपत्रात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चौकशी करा या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित करण्यात आली. सदर बातमीतील तक्रारकर्ता हे प्रणय खुणे यांनी मुख्य वनसरंक्षक यांना आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात संबंधाने निवेदन दिलेले होते. प्रणय खुणे यांनी दिलेले निवेदन हे तथ्यहिन आहे.
आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर वन विभागात धडाळीने कार्य केल्याने कमी वयातच त्यांची बढती होवून ते आलापल्ली वनपरिक्षेत्र येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वनविभागातील स्वच्छ व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतीमे मुळे सन 2021 मध्ये प्रशासनाने वनपरिक्षेत्र कार्यालय, पेरमिली चा अतिरिक्त कारभार त्यांना दिला त्यावेळी सकिनगट्टा नियतक्षेत्रात मोठया प्रमाणात मुरूम उत्खनन करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनाकडून मिळताच प्रकरणाची दखल येत बेकायदेशीर उत्खननाच्या स्थळी जावून कार्यवाही केली. सदर बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणामध्ये नितिन खुणे, रोहण खुणे, मयुर खुणे, लोकेश डोगरवार व इतर यांचेवर भारतीय वन कायदा अन्वये कलम 26 (1) A,D,E,F,G,52 (2) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणामध्ये वन गुन्हयातील काही आरोपी हे खुने यांचे आप्तसंबंधी आहेत. सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून प्रकरण क्र. 491/2022 सरकार -विरूध्द- संदीप परते व इतर न्यायप्रविष्ठ आहे. सदर प्रकरण 20 जुन 2023 रोजी खटला साक्षपुराव्याकरीता मुकर्रर आहे.
सदर प्रकरणामध्ये शेरेकर हे तपासी अधिकारी असून महत्वाचे साक्षदार आहेत. त्यांची दि. 20 जुन 2023 रोजी कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी अहेरी येथे साक्षपूरावा आहे. अशा परिस्थितीत आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेवर खटला कमकुवत करण्यासदर्भात दबाव आणन्यासाठी व त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हेतूपुरस्पर तथाकथीत तक्रार देवून आप्तसंबंधीयांना गुन्हयातून वाचविण्यासाठी खुने यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. सन 2021-22 मध्ये वनपरिक्षेत्र ताडगांव-गटटा या परिक्षेत्रात मोडणारे बोटनफुंडी रस्ताचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी सदर कंत्राट हे श्री. व्हालीया यांच्या नावाने आहे परंतु सदर काम हे पेट्टी कंत्राटदार प्रणय खुने यांनी केल्याचे निर्देशनास आले. सदर रस्त्यावर 20 ते 25 हजार ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर रित्या उत्खनन करून तसेच अनेक वृक्षांना नुकसान केल्याने संतोष ताटीकोंडावार यांनी सबंधीत विभागाला तक्रार दिले व वट्टेगटा-गट्टेपल्ली सदर रस्त्याचे काम हे प्रणय खुने यांनी केलेले असून त्यांनी 1000 ब्रास मुरूम खोदकाम केल्याने त्यांचेवर वनगुन्हे दाखल आहे.
वन विभाग यांनी कारवाई करीत असतानाच प्रणय खुणे हे स्वतःच्या बचावासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावरच आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे व हे आरोप बिनबुडाचे असल्याचे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर हे या भागातील स्थानिक असुन शिक्षणाचे पर्याप्त साधने नसतांना सुध्दा मेहनतीने उच्च शिक्षण घेवून प्रशासनातील पद संपादन केले आहे. जिल्हयात जिल्हया बाहेरील व जिल्हयातील अधिकारी नोकरी करायला उदासिन असतांना अशा परिस्थितीत आपल्या जिल्ह्याच्या उन्नतीसाठी त्यांनी वनपरिक्षेत्र आलापल्ली येथे स्वच्छेने वनविभाग प्रशासनाचा कारभार स्विकारला. पद स्वीकारताच शेरेकर यांनी अवैध वनगुन्ह्यांन वर आळा घालण्यासाठी ठोस पाऊले उचलली. वन विभागात कंत्राटदारांचे नियमांना पायमल्ली करून चालत असलेले मनमानी कारभार थांबविण्यासाठी दोषींवर कार्यवाही करत गुन्हे नोद केले.
योगेश शेरेकर हे दलित समाजातील असून प्रशासनात व समाजात असलेली त्यांची व परिवाराचे प्रतिष्ठा मलीन करून बदनाम करण्याचा सुळबुध्दी चा उद्देश ठेवून खुने यांनी बिजेपी पक्षाचा लेटरहेड स्वतः च्या स्वार्था साठी वापर केल्याने बिजेपी पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने दलीत व मागासवर्गीय समाजा मध्ये बिजेपी पक्षा विषयी निर्माण केलेला विश्वासाला तडा गेला असून दलीत व मागासवर्गीय समाजामध्ये बिजेपी पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून त्याचा विपरीत परिणाम येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसेल असे म्हटले आहे. निमसकेलेल्या करीत आहे. शेरेकर यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यात अडथळा आणून त्याचे खच्चीकरण केल्यास इतर अधिकारी यांना सुध्दा कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कंत्राटदारांसमोर नमते व्हावे लागेल. यामध्ये शासन व प्रशासनाची बदनामी होईल असे म्हटले आहे. प्रणय खुणे याच्यावर अनेक वन गुन्हे दाखल आहेत. तसेच महसूल कर्मचाऱ्यांना मारहाणीबाबत पोलिस विभागाकडे गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तिचे तक्रारीची दखल घेणे म्हणजे संपुर्ण न्यायव्यस्थेचा अपमान आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांची वनसंरक्षक, गडचिरोली यांचेकडे केलेली तक्रार निरस्त करून खुणे यांचेवर तात्काळ भादवीअन्वयें फौजदारी गुन्हा नोद करून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भामरागड चे उप वनसंरक्षक यांच्या मार्फ़त जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे..