दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : खेड तालुक्यातील आळंदी देवाची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी केळगावचे माजी सरपंच दिलीप कांताराम मुंगसे व व्हा.चेअरमन पदी आळंदीच्या अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे यांची बिनविरोध निवड झाली आहे असे सचिव सचिन कुऱ्हाडे यांनी सांगितले.
आज निवडणूक अधिकारी एस.एम.धारवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चेअरमन पदासाठी दिलीप मुंगसे व व्हा. चेअरमन पदासाठी अरुणा घुंडरे यांचेच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी एस.एम.धारवाड यांनी चेअरमन पदी दिलीप मुंगसे व व्हा.चेअरमन पदी अरुणा घुंडरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे संचालक व बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील,माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, आदित्य घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, बाबुलाल घुंडरे, सिंधूताई कुऱ्हाडे, वासुदेव मुंगसे, रोहीदास मुंगसे, सुभाष सोनवणे, अनिल भांडवलकर, संतोष विरकर, विवेक घुंडरे, दत्तात्रय कुऱ्हाडे, नितीन घुंडरे, योगेश घुंडरे तसेच आळंदी आणि केळगाव चे ग्रामस्थ उपस्थित होते.