भाऊसाहेबांचे कार्य दिपस्तभासारखे :- प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

          छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची ५८ वी पुण्यथिती संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांनी प्रतिमेचे पूजन वं हारार्रपण करण्यात आले. त्याच प्रमाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक वं शिक्षेत्तर कर्मचारी वं विध्यार्थीनी प्रतिमेचे पूजन केले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांनी असे प्रतिपादन केले की, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती, शिक्षण, समाजप्रबोधन, या क्षेत्रात दिपस्तंभासारखे कार्य केले. त्यानी केलेल्या अंतरभूत कार्यामुळे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबानी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरून कृषी वं संलग्नित श्रेत्राना विकास प्रक्रियेच्या केंद्र स्थानी आणले. समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण श्रेत्राचा विकास होणे महत्वाचे आहे आणि आपला महाराष्ट्र शिक्षण श्रेत्रात पुढे जाण्याचे श्रेय भाऊसाहेबांना आहे. समाजातील जातीयता, अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी शिक्षण श्रेत्रात प्रगती करण्याचा विचार पुढे ठेऊन त्यानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वं प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुवर्णा जवंजाळ यांनी केले.

या कार्यक्रमाला डॉ. कल्याणकर डॉ. काळे, डॉ. इचे, प्रा. लिल्हारे, प्रा. मोने, वाटणे, निभोरकर, कडू रासेयो चे स्वयंसेवक व विध्यार्थी मोठया संख्येने उपास्थित होते.