नगर परिषद चिमूर अंतर्गत वडाळा पैकू येथील स्म्शानभूमीची दुरावस्था,सौंदरयी करणं करावे.. ज्ञानेश्वर शिरभय्ये माजी सरपंच वडाळा (पैकू)

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       वडाळा पैकू,सम्शानभूमी,ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती त्याकाळात देखरेख ग्रामपंचायत खाली सुरळीत आणि सुरक्षित होती. 

        परंतु जेव्हा चिमूर नगर परिषद मध्ये वडाळा पैकू समविष्ट २०१५ ला करण्यात आले तेव्हापासून दुर्लक्षित असल्याचे विचित्र चित्र दिसत असल्याचे मत माजी सरपंच ज्ञानेश्वर शिरभैय्ये यांचे आहे. 

       एका बढ्या व्यापारी व्यक्तींनी सदर स्म्शान भूमी हडपण्याचा प्रयत्न २०/२५ वर्षांपूर्वी केले होते.परंतु २००५ चे दरम्यान कोर्ट कार्यवाहीत स्वतः श्री ज्ञानेश्वर रतिरामजी शिरभय्ये,यांनी सरपंच पदावर विराजमान असताना सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गाव नागरिकांना विश्वासात घेऊन आयुक्त कोर्ट नागपूर येथे लढा दिला होता.

         स्मशान भूमी अतिक्रमण बाबत चिमूर तहसील कार्यालयला लेखी निवेदन देऊन,संपूर्ण गाव नागरिक मिळून तिरडी मोर्चा काढला.सदर मोर्चाला ५ हजार पुरुष महिला हजर होते.

       तात्कालीन तहसीलदार अरुण झलके यांनी जनहितार्थ मागणीचे निवेदन स्वतः गावकरी मोर्चेकरी,जण नागरिक यांचे समक्ष स्वीकारले आणि सर्व संबंधित महसूल विभाग यांना आणि सरकार ला सदर मागण्याचे निवेदन फॅक्स द्वारा पाठविण्यात आले होते.तात्कालिन तहसीलदार अरुण झलके यांनी आश्वासनातंर्गत लेखी पत्र दिले होते.  

       कोर्ट आयुक्त नागपूर यांनी निकाल ऑर्डर अनुषंगाने तात्काळ स्मशान भूमी मोजणी करून तारेच कंपाऊंड केले आणि शेड आणि वाॅलकंपाड बांधकाम केले.तसेंच भारत निर्माण योजना अंतर्गत पाणी टाकी बांधकाम करण्यात आले.

          परंतु १० वर्षांपासून आज तागायत सदर स्म्शान भूमी मध्ये घनदाट काटेरी मोठं मोठी वृक्ष मोठ्या डौलाने उभी आहेत.अनावश्यक काटेरी झुडपे असून त्यामध्ये स्वापद हिंस्त्र पशु वावर करतात. 

        जेव्हा रात्र बेरात्री शव,प्रेताची अंत्यविधी करायच वेळ असते तेव्हा,नागरिकांना खूपच त्रास सहन करावे लागतो आहे.याबद्दल नगर परिषद चिमूर यांना,तोंड आणि लेखी निवेदन देऊन सुद्धा तात्कालीन मुख्याधिकारी राठोड यांनी दखल घेतली नाही याबद्दल माजी सरपंच ज्ञानेश्वर शिरभैय्ये यांनी खेद व्यक्त केलाय.

           स्मशान भूमीच्या सुविधाची जाणीव ठेऊन देखरेख आणि दुरुस्ती करिता तत्परता दाखवायचे सोडून दुर्लक्षित आहे.मुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांचे शासन अंतर्गत महसूल विभाग द्वारे १०० दिवस उपक्रमांतर्गत कार्यक्रम दिनांक ७/३/२०२५ चिमूर तहसील मध्ये संपन्न झाले.

      त्यामध्ये तहसीलदार श्रिधर राजमाने,यांना सदर समस्या बद्दल अवगत केले. तेव्हा वडाळा पैकू स्मशान भूमी चा संपूर्ण परिसर स्वछ करून सौंदरीकरणं करावे अशा मागणीचे निवेदन माजी सरपंच ज्ञानेश्वर शिरभैय्ये यांचे द्वारा देण्यात आले आहे.