
ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये युवा अवस्थेपासून काम करूनही आत्ताच्या शिवसेना उ.बा.ठा. मध्ये सततची मानहानी होत असल्यानेच माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा यासाठीच विकासपुरुष आणि विकासाची दृष्टी असलेल्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मुंबई येथे प्रवेश करून आरमोरी येथे त्यांचे आगमन होताच स्थानिक विवेकानंद विद्यालयासमोर त्यांचे जंगी स्वागत व महिला कार्यकर्त्यांकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर रॅली काढून त्यांच्या निवास स्थानी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ.रामकृष्ण मडावी म्हणाले की यापुढे अजितदादाचे नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाय महाराष्ट्रात कोणतेही सरकार येणार नाही. जिल्ह्यातील नेते राजे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा झेंडा फडकवणार असल्याची ग्वाही दिली.
त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाचे संपूर्ण श्रेय माजी कॅबिनेट मंत्री व आमदार राजे डॉ. धर्मराव बाबा आत्राम, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांना दिले आहे.
सभेचे अध्यक्षस्थानी माजी कृषी सभापती तथा प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, होते. तर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, देसाईगंज तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, देसाईगंज शहर अध्यक्ष लतीफ शेख, गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, डॉ.सोनल कोवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा रुषाली भोयर, सुषमा येवले, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या कल्पना तिजारे, माजी सभापती भजन मडकाम, महिला तालुका अध्यक्षा संगीता मेश्राम, शहर अध्यक्षा जयश्री भोयर, विद्या मेश्राम, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, भूमिका बागडे, रामदास दहिकर, सुनील बांगरे, पितांबर लांजेवार, रमेश पगाडे, राजु आकरे उपस्थित होते.
यावेळी नाना नाकाडे, दिलीप मोटवानी, डॉ. सोनल कोवे, अमीन लालानी, सुनील नंदनवार, कल्पना तिजारे, संजय साळवे, अमोल कुळमेथे रुषाली भोयर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
स्वागत, रॅली व सभेच्या यशस्वीतेसाठी राकेश बेहरे, प्रफुल राचमलवार, प्रशांत मोगरे, विजय झोडे, जि. व्ही.हुलके, आकाश मडावी, अक्षय बोरकर, रिंकू झरकर, विनोद निमजे, अनिल अलबनकर, रवी दुमाने, विनोद बेहरे, आदेश निंबोळ, प्रफुल बोरकर, मनीष कोहाडे, रुपेश खरवडे, नाजुका देशमुख, संगीता घाटूरकर मयूर बेहरे, अमित सुरपाम, इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, संचालन रुखमोडे आणि आभार प्रदर्शन मनीष कोहाडे यांनी केले.