वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने लावले पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरा… –”चितेगांव बिट व मरेगांव परीसरातील वाघाला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना”…

      सुधाकर दुधे

 सावली तालुका प्रतिनिधी 

        वनपरिक्षेत्र सावली,नियत क्षेत्र टेकाडी ,मौजा चिमढा येथील शेतशिवारात गुरुवार ला(दि.६ मार्च) चांदली येथील मेंढपाळ निलेश कोरेवार यांचा एम आय डी.सी,मुल परीसरात वाघाने हल्ला करून बळी घेतला, तर मुल वनपरिक्षेत्रातील सोमनाथ कडे ८ मार्च ला पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एका मेंढपाळ ठार झाला, वाघाच्या हल्ल्यात दोन मेंढपाळाचा मृत्यू झाल्याने वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कंबर कसली आहे.

         चितेगाव बिटातील मरेगांव व चितेगांव परीसरात उमा नदी काठालगत असलेल्या वनपरिक्षेत्रात वाघाचे अस्तित्व असल्यामुळे आणि झालेल्या मनुष्यहानी मुळे नागरिक भयभीत झाले.त्यामुळे मनुष्यहानी होऊ न यासाठी उपाययोजना म्हणून वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आले, आणि 3 लाईव्ह कॅमेरे व 14ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

       या पध्दतीने परीसरात वनविभागाच्या वतीने खबरदारी म्हणून उपाय योजना करण्यात येत आहेत

बॉक्स 

         सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नियत क्षेत्र टेकाडी व चितेगाव परिसरात नुकताच वाघाच्या हल्ल्यात की वाघिणीच्या हल्ल्यात ठार झाले आहे ,हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.सदर परिसरात असणाऱ्या वाघिणीला तीन बछडे आहे.

          सदर वाघिणीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला असून तीन लाईव्ह कॅमेरे व आठ ट्रॅप कॅमेरे लावून सदर वाघ किंवा वाघिणीचा मागोवा घेणे सुरू आहे.

प्रतिक्रिया

3 लाईव्ह कॅमेरे व 14 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत नदीकाठावरील वन क्षेत्रात वाघिणीचे अस्तित्व असल्याने लगतच्या कास्तकारांनी शेतात ये -जा करतांना विशेष काळजी घ्यावी.वसग किंवा वाघीण आढळून आल्यास ताबडतोब वन कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. 

         सदर कमी 36 वन कर्मचारी तैनात असून 24 तास निगराणी ठेवून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत करिता आजूबाजूचे नागरिक व शेतकरी बंधूंनी सहकार्य कारावे असर आवाहन सावली वनविभागाने केले आहे.

        विनोद धुर्वे 

वनपरिक्षेत्र अधिकारी सावली