
विश्वात आणि देशात दोनच शक्ती.एक निसर्ग नियमांना मानणारी मानवतावादी अर्थात संविधानवादी.
— दुसरी,न मानणारी म्हणजे मानवताविरोधी अर्थात संविधानविरोधी…….
“वरील दोन शक्तीमधला संघर्ष म्हणजेच क्रांती – प्रतीक्रांतीचा संघर्षमय इतिहास होय. या इतिहासात माणूसच पुरता भरडला जातोय,असं नाही तर यांच्यासोबत इतर सजीवसृष्टी सुद्धा!
वरील दोन शक्तीतला संघर्ष हा जरी प्राचीन जगाच्या इतिहासातील असला,तरी मानवी संस्कृतीतील पाच लाख वर्षापैकी केवळ सहा ते सात हजार वर्षातील आहे.तेही आर्याच्या मानसिक विकृतीतून निर्माण झालेली शक्ती आहे!
नाहीतर पाच लाख वर्षातील सहा ते सात हजार वर्षे तुलनेने काहीच नाहीत. जवळपास चार लाख त्र्यान्नव हजार वर्षे येथील मर्कट अवस्थेतील मानव निसर्ग नियमांना अनुसरून हळुहळू का होईना त्याच नियमानुसार जगत आलेला होता. परंतू , वरील निसर्ग नियमांना छेद देऊन, भेदाच्या भिंती उभारून शेवटी एका मेंदूचेही दोन तुकडे करण्याची कू संस्कृती निर्माण करणाऱ्या या दुसऱ्या शक्तीचा उदय झाला. बघता बघता या शक्तीने संपूर्ण विश्व् अवघ्या 6 ते 7 हजार वर्षात व्यापले!
या कृत्रिम मानवताविरोधी शक्तिमुळेच.
जगात माणसाचे अर्थात प्राणीमात्राचे रक्तरंजित पाट वाहिले.यामध्ये इ. स. पूर्व 2350 ची एरूकागिनेची पहिल्या चळवळीपासून ते आतापर्यंत चालत असलेल्या ताज्या रशिया – युक्रेन, गाझा पट्टीतील रक्तरंजित पाट वाहणाऱ्या घटनापर्यंतचा इतिहास होय.या सर्व रक्तरंजित इतिहासाची जननी सुद्धा याच जागतिक स्तरावरील सोफेस्टीकेटेड अर्थात फॅसिझम आणि भारतीय नावाने ओळख असलेली RSS ची कुटनीती होय.
म्हणूनच तथागत भगवान बुद्धानी या प्रथम निर्माण झालेल्या मानवताविरोधी शक्तीला प्रथम शह देण्याचा प्रयत्न केला तो त्या शक्तीचा विरोध करुन नव्हे.तर अंधश्रद्धेतील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर 100% उतरणारी आकलनीय उत्तरे निसर्ग नियमातुन शोधून पुन्हा एकदा जगाच्या पटलावर व्यवस्थितरित्या जगासमोर ” धम्मक्रांतीतून ” मांडली….
जो जगासमोर मानवी कल्याणाचा स्वच्छ आरसा होता…
आणि हाच प्रयत्न या मानवताविरोधी शक्तीला अर्थात RSS / फॅसीझमला रुचला नाही. म्हणूनच त्यांनी या पहिल्या क्रांतीला शह देण्यासाठी प्रतीक्रांती केली.ती म्हणजे महायान आणि हीनयानाची निर्मिती करुन.
म्हणजे विरोधकांना कायमचे संपवायचे असेल तर त्यांच्या पोटात शिरून गुळात विष मिसळवून संपवणे.म्हणजे मरताना विषाचा प्रादुर्भाव जाणवू नये. त्यासाठीच साम, दाम,, दंड आणि भेदाच्या कुटनीतीला जन्माला घालणारी ही दुसरी शक्ती आहे.
म्हणजे या कुटनीतीने पहिल्यांदा त्यांना शह देणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्माला या देशातून व जगातून हद्दपार करण्याचा सर्व स्तरावर प्रयत्न केले.त्यात ते बहुतेक यशस्वी सुद्धा झाले.परंतू ,सम्राट अशोक,सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन यांच्या राजाश्रायामुळे त्यांची हतबलता झाली.परंतू संधी मिळताच पुन्हा पुष्यमित्र श्युंगाच्या प्रयत्नाने आपल्या देशात पुन्हा एकदा हा धम्म लयास गेला. एवढेच नव्हे तर दरम्यानच्या काळात म्हणजे साढेतेराशे वर्षात या देशातून बुद्ध धम्माचे ऐतिहासिक साधने नष्ट करण्याचे पुरेपूर प्रयत्न केल्या गेले.
ज्या पद्धतीने भगवान बुद्धानी या कुटनीतीच्या मर्मावर घाव घातला मानवतेच्या कल्याणासाठी…
याच कुटनीतीने भगवान बुद्धानी संशोधन केलेल्या धम्माच्या मर्मावर प्रतीवार केला निसर्गनियमांना व मानवतेला संपविण्यासाठी…
परंतू ,एवढे आटोकाट प्रयत्न करुन सुद्धा,सर्व स्तरावर लढाया लढून सुद्धा या विश्वातून व देशातून या निसर्गनियमावर आधारलेल्या विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी डोळस श्रद्धा असलेल्या धम्माला कायमचे नष्ट करण्यात कायमचे अपयश या कुटनीतीला आले.
जेंव्हा…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याच धम्माचे चक्र पुन्हा संविधानक्रांतीतून गतिमान केले…..
तेंव्हा मात्र या कुटनीतीची साढेतेराशे वर्षाची कायमची झोपच उडाली…
आणि मग पुन्हा एकदा धम्मक्रांतीला संपविण्याचे प्रयत्न सोडून संविधानाला संपविण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. धम्माचे सार्वजनिक रूप हे कमी करण्यात यशस्वी झाले खरे.परंतू,संविधानाचे सार्वजनिक रूप ( जे संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्याने करण्याचे एक सूत्र म्हणजे भारताचे संविधान ) पसरू नये,वाढू नये,विश्वात काय तर देशात सुद्धा पसरू नये म्हणून आटोकाट प्रयत्न तीच्या निर्मितीपासूनच करण्यात येत आहे.
म्हणजे या मनुवाद्यांना पहिला धाक धम्माचा होता.तो त्यांनी देशातून हाकलून लावून, महाबोधी विहारावर अतिक्रमण केले.म्हणजे ते तथागतांच्या धम्मसंस्कृतीवर त्रिपीटकात जातककथाच्या कर्मकांडाच्या,अंधश्रद्धे कथा घुसवून धम्माला सुद्धा विज्ञानवादी ठेवले नाही.
आणि आता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे दुसरे त्याहून मोठे आव्हान उभे केले.जे त्या कुटनीतीसाठी अवघड जागेचे कायमचे दुखणे होऊन बसले!
परंतू,तरीसुद्धा त्यांनी हार न मानता,संविधान निर्मितीपासूनच तीला हळू हळू विरोध करत करतच संपविण्याचा घाट घातला.त्यासाठी त्यांनी या 75 वर्षात सुरुवातीला गोगलगाईची गती घेतली. त्यानंतर 1976 ला कासवाची गती घेतली.आणि आता 2014 पासून सशाची गती घेतली.आता शेवटची 2024 पासून प्रकाशवर्षाची गती घेतली….
या गतीला रोखण्याचे काम आपल्याला करायचे आहे….
त्यासाठी गुलामीला गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे तो व्यवस्थतीत स्थिरावलेल्या अव्यवस्थेविरुद्ध बंड करुन उठल्याशिवाय राहणार नाही.या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या शेवटच्या संदेशाचे चीज करुन या कुटनीतीला कायमचे जगातून हद्दपार करण्यासाठी त्याग आणि संघर्षातून समर्पित होऊया….
त्यासाठी प्रथम एकच उपाय आहे,कुणालाही दोष न देता, किंतु ,परंतू ,जर,तर या शंका उपस्थित न करता अशी की,कल्पना करू की,देश आता स्वतंत्र होऊन नेमकेच भारताचे संविधान लागू झाले आहे. आणि या संविधानातील 395 कोहिनुर हिऱ्यांची ओळख देशाला करुन देण्याची जबाबदारी आम्ही भारताचे लोकं मधून मी स्वतः अधिनियमित करुन अंगीकृत करण्याची माझी जबाबदारी ओळखून कर्तव्यातून मी ( अनंत भवरे ) सिद्ध होणार…..
तुम्ही?
निदान संविधान जागृतीच्या कार्यशाळा महाविद्यालयीन युवापिढीसाठी आणि विशेषतः बहुजन समाजातील युवापिढीसाठी आयोजित करा आणि माझ्यासारख्या संविधानाची जाण असणाऱ्यांना निशुल्क बोलवा….
शेवटी संविधान जागृती देशाची प्रगती शिवाय अन्य पर्याय नाही. कोणत्याही धार्मिक ग्रंथात यावर उपाय नाहीत. म्हणून संविधान जागृती कार्यशाळा हाच एकमेव उपाय…
तरच कुटनीतीला हळू हळू का होईना जगातून आणि देशातून हद्दपार करु शकतो….
जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद 7875452689…