कूरखेडा येथे कृषीपंपाच्या विज समस्येवर ना.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन..

    राजेंद्र रामटेके

ग्रामीण तालुका प्रतिनिधी

       कुरखेडा..

        तालूक्यात अनेक ठिकाणी करण्यात येत असलेल्या कृषीपंपाचा भारनियमनामूळे रब्बी धान पीक धोक्यात आले आहे. या विरोधात कांग्रेस पक्षाचा वतीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांचा नेतृत्वात दि १३ मार्च रोजी चक्काजाम व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

       तालूका कांग्रेस‌ व शेतकर्यांचा‌ वतीने कूरखेडा-वडसा मार्गावर चक्काजाम आंदोलन व तहसील कार्यालय कूरखेडा समोर धरणे आंदोलन दि ११ मार्च रोजी करण्यात येईल असे निवेदन यापूर्वीच देण्यात आले आहे.

          मात्र ना. वडेट्टीवार हे दि १३ मार्च रोजी कूरखेडा येथे पोहचत असल्याने आंदोलनाचा तारखेत बदल करीत हे आंदोलन विजय वडेट्टीवार, कांग्रेस प्रदेश महासचिव डॉ नामदेव कीरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आ. आनंदराव गेडाम यांचा नेतृत्वात करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुका कांग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे यानी दिली आहे.