आयुष्याचा हिशोब…

 

    “प्रत्येकाने जीवनात वर्षातून एकदातरी मागे वळून बघायलाच पाहिजे..!”

आपल्या कर्तव्याची बेरीज आणि वजाबाकी करायलाच पाहिजे..!

   बचत असली तर ती पुढीलवर्षी कशी वाढेल,याचाच विचार केला पाहिजे…!

नसेल तर,पुढीलवर्षी बचत केलीच पाहिजे…. !

भरमसाठ असेल तर ती इतरांना वाटलीच पाहिजे… !

    कारण अंतर्मुख होऊन आपण आपल्याच जीवनाकडे बघितले असता त्या आरशात हा हिशोब नक्कीच बघायला मिळेल…. !

     आणि या आरशातच आपल्या भावी जीवनात खरे,-“सुख आणि दुःख-,कसे आहे याची प्रचिती येईल…. !

   आपल्या मेंदूतील “वढाळ” मनाचा “कासरा ” आपल्या हातातून जेव्हा सुटेल तेंव्हा आपल्याला त्याच्याच मागे धावण्याशिवाय गत्यंतर नसते आणि त्या धावण्याच्या शर्यतीलाच आपण जीवनप्रवाह समजून बसतो…. !

     आणि या जीवनप्रवाहाची आणि महापुरुषानी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची कुठेच “सांगड ” बसत नाही… !.

    मग आपण ती सांगड घालण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलो की मग आपण त्या “मोहत्यागी इतरांच्या(आपल्यासाठी ) कल्याणासाठी जीवन झिजविलेल्या महापुरुषांना ” आपल्या भिंतीवर बसवतो…. !

 मग आपल्याला एकप्रकारे “लायसन”

मिळाल्याचा असुरी आनंद मिळतो….. !

       मग आपण अशा जीवनप्रवाहात कसेही वाहत गेलो तरी त्याची तमा या लायसनमुळे आपल्याला नसते… !

    आणि एक दिवस आपला जीवनप्रवाह संपतो… !

    ज्याप्रमाणे या जीवनप्रवाहाचे दोन किनारे असतात…. !

   एक महापुरुषांच्या त्यागी जीवनाचा किनारा….. !

आणि दुसरा आपल्या कूटनीतीतून निर्माण झालेला, नैतिक कर्तव्याला बगल देऊन बाजूने हळूच निर्माण केलेले “वळण”…..!

  या दोन किनाऱ्याचा कधीच संगम होऊच शकत नाही…..!

**

👇👇

   म्हणूनच,”वामनदादा कर्डक,आपल्याला आचरणातून सांगतात आणि आपणही आचरणातून ऐकलंच पाहिजे…! 

     “मन ही आग आहे,विषारी नाग आहे,मनच मानवाच्या शीलाचा डाग आहे…

     मन हे उतावळे,वासनेपाठी पळे,वाईटाशी त्याचे नाते पटकन जुळे.‌‌.‌

    जीवन ज्याने जळे,याला हे न कळे.चालली नाशाकडे,त्याच वाटेला पळे… 

    वळता बुद्धाकडे परिवर्तन घडे. 

नीतीच्या नगरीमध्ये,रंग जीवनाला चढे…

***

👇👇

—-” मना सच्छील ठेवितो सदा वीर असा गौतम आहे..‌ 

ज्याने प्रेमाने जिंकिले जगा, वीर असा गौतम आहे….!

    (गीतकार आणि गायक वामनदादा )

           लेखक 

       अनंत के.भवरे 

(औरंगाबाद 7875452689)