युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यातील गायवाडी – कळाशी – आमला या मुख्यरस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून अनेकदा हा रस्ता बांधकाम विभागामार्फत डागडुजी करणात येतो परंतु या रस्त्याची परिस्थिती जैसे थे असून नागरिकांना ये – जा करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा स्वरूपाचे पत्र कळाशी गायवाडी शिगनवाडी आमला खैरी कुकसा येथील नागरिकांनी बांधकाम विभागास दिले आहे.
या रस्त्यालगत असणाऱ्या गावामध्ये दवाखान्यासंबंधी कुठलेही काम असल्यास रात्री बे रात्री आमला किंवा दर्यापूरला जावं लागतं . नागरिकांनी अनेकदा अपघाताला तोंड दिले असून जीव धोक्यात आल्याची भावना जनमानसात व्यक्त होत आहे.
परिणामी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा कळाशी गायवाडी शिगनवाडी खैरी कुकसा येथील नागरिक आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील असेही या पत्रात म्हटले आहे.
यावेळी गायवाडी शिगनवाडी कळाशी आमला खैरी कुकसा येथील गावकरी मंडळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे रामदास गावंडे हरिभाऊ नागे शेवंता बाई गवई बाबाराव कळसकर संदीप येवले अमोल राऊत आशिष देवतळे राजू राऊत श्रीकृष्ण साखरे उमेश गवई पूर्णा गवई संतोष साखरे संजय जामणिक शुभम कडू यादवराव तिडके आदी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.