प्रमोद राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर शहरालगत खरकाडा येथील लाखे पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहनाने दूचाकी वाहनास धडक देऊन पसार झाला असून दूचाकी वाहक जागीच ठार झाला आहे.
चिमूर शहराकडे येणाऱ्या कानपा – चिमूर मार्गावरील खरकाडा येथील लाखे पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहनाने एम एच 40 AA 8610 सुधीर विष्णू तीनपटले अंदाजे वय 55 सुभेदार नगर नागपूर येथील दूचाकी वाहन चालकास सकाळी 10 वाजताच्या दरम्यान धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, संजय वाकडे, टायगर ग्रुप चे रोहन नन्नावरे, रवी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरर्ते यांना तपास कार्यात मदत केली व मृतकाची बॉडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करीता पाठविण्यात आली.
घटनास्थळी मृतक सुधीर तीनपटले यांच्या जवळ 47 हजार रोख रक्कम, चांदीची चैन, व दोन पंचधातू अंगठी सापडली, वृत् लीहेपर्यंत तक्रार नोंद झाली नव्हती.