नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
भंडारा:- आज आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थाचा संघ भंडारा ची निवडणूक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भंडारा येथे पार पाडली.भंडारा जिल्हयात आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेच्या एकुण १६ संस्था आहेत.या निवडणुकीत धर्मराजभाऊ भलावी गट व सदाशिव वलथरे गट यांच्यात लढत मोठ्या चुरशीची लढत झाली व या निवडणुकीत भलावी गटाने एक हाती सत्ता मिळवून विजयी झाले. धर्मराज भलावी गटाचे सर्व आठही उमेदवार विजयी झाले.