डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिन जिल्हा असून येथील आदीवासी भागात राहणाऱ्या नागरिकाचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने आज दिनांक १०/०३/२०२३ रोजी मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “पोलीस दादालोरा खिडकी ” चे माध्यमातून पोमके ताडगाव येथे जनजागरण मेळावा तसेच त्यांच्या हस्ते पोमकें ताडगाव येथील नविन प्रशासकिय इमारतीचे उदघाटन सोहळा पार पडला.

 

यावेळी जनजागरण मेळाव्यास उपविभाग भामरागड अंतर्गत पोमकें ताडगाव हद्दीतील ५०० च्या संख्येने नागरीक उपस्थीत होते. उपस्थित आदिवासी नागरिकांना कार्यक्रमस्थळी मा. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले असुन त्यात शिलाई मशील, स्पे. पंप औषधी फवारणी, मच्छरदाणी भाजीपाला किट, बियाणे, फास्टफुड किट, प्लास्टीक बकेट, टिकाव, फावडे, ताडपत्री, सिंटेक्स, आदीवासी समाजासाठी स्वयंपाक साहीत्य (मोठे गंज झाकणीसह, स्टील बकेट, चमचे, वाटे, जग, भात वाढणी, स्टील वाट्या, स्टील ताट, भोजन चटई) तसेच शालेय विद्यार्थ्यासाठी व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल, नोटबुक, कंपास, पेन्सील / खोडरबर, बॅट/बॉल, बॅटमिंटन, बॅटमिटर शटल बॉक्स, बॅटमिंटन नेट, स्टम्प्स सेट, बॉल पेन, स्कूल बॅग व मंच चॉकलेट इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांनी उपस्थित नागरीकांना संबोधीत करतांना सांगीतले की, पोलीस दलाचे कर्तव्य आहे की, गडचिरोलीतील नागरिकांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी पोलीस नेहमी कटीबद्ध आहेत. दुर्गम भागात काम करणाऱ्या अधिकारी / अंमलदार यांनी आणखी उत्कृष्ट काम करावे, तसेच पोलीस आणि नागरिक यांनी एकजूट होऊन या भागाचा विकास केला पाहीजे. तसेच मा. पोलीस सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई श्री. शिरीष जैन सा. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषाणात सांगीतले की, मी जेव्हा गडचिरोली होतो, तेव्हा आणि आता विकासाच्या बाबतीत खूपच फरक पडला आहे. आज लोक आनंदित आहेत, त्यांच्यापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचत आहेत, हे सर्व फक्त गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे. तसेच यावेळी उपस्थित मा. पोलीस उप महानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, आगामी काळात गडचिरोली जिल्हा देखील औद्योगीकदृष्ट्या प्रगत होईल, त्यासाठी तुमच्या मुला-मुलींना शिक्षण द्या. पोलीस दल नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी आपल्या भाषणात पोमकें ताडगाव हद्दीतील नागरीकांना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आवश्यक सर्व शासकिय सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करु तसेच गडचिरोली पोलीस दलाने नव्याने सुरु केलेल्या प्रोजेक्ट उडाण व प्रोजेक्ट उत्थान या उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “एक गाव एक वाचनालय” या उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ६० पोस्टे / उपपोस्टे / पोमकें ठिकाणी नवीन वाचनालय उभे करणे आहे असे सांगीतले. पोमके ताडगाव येथील मेळावा झाल्यानंतर मा. पोलीस महासंचालक म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांनी नविन उभारण्यात आलेले मन्नेराजाराम येथिल पोलीस मदत केंद्राला भेट दिली. त्यावेळी पोमके परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला व कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व जवानांचे मनोबल वाढविले. तसेच त्यानंतर प्राणहिता येथील विशेष अभियान पथकातील जवानांचे दरबार घेतला व दरबार मध्ये जवानांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना नक्षलविरोधी अभियानाबाबत मार्गदर्शन केले. तसेच यावर्षी २९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले, त्यापैकी प्राणहिता येथे ०१ अधिकारी व ०७ अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला.

 

आजपर्यत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिंग असिस्टंट १९९७, हॉस्पालिटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, ईलेक्ट्रीशिअन १६७, प्लंबींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्युटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असे एकुण ३०२९ गडचिरोली जिल्ह्यातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १४०, मत्स्यपालन ८७, कुक्कुट पालन ५६६, बदल पालन १०० शेळीपालन ११५ शिवणकला २४१, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीसभरती पूर्व प्रशिक्षण १०६२, दु व्हिलर दुरुस्ती ९९, फास्ट फुड ९६, पापड लोणचे ५९, कराटे प्रशिक्षण ४८, ड्रायव्हींग ५०२ असे एकुण ४७८७ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

सदर कार्यक्रमास मा. पोलीस महासंचालक श्री रजनीश सेठ सा., मा. पोलीस सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई श्री. शिरीष जैन सा., मा. पोलीस उप महानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापूरे, असिस्टंट कमाण्डंट, सिआरपीएफ श्री. कमलेश इंदोरा, तसेच श्री. सिताराम मडावी, आधुनिक शेतकरी, श्री. लालसू आत्राम, माजी सभापती, पं.स. भामरागड, श्रीमती कविता इत्तमवार, नगरसेविका, नगरपंचायत भामरागड व श्रीमती. तेजस्विनी मडावी, नगरसेविका भामरागड हे उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापूरे, पोलीस मदत केंद्र ताडगावचे प्रभारी अधिकारी श्री. प्रेमशहा सयाम सा. व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com