सावरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादीका

           क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चिमूर तालुक्यातील मौजा सावरगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक एकनाथ गोंगले होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून बसपाचे माजी चंद्रपूर जिल्हा प्रभारी धर्मदास गेडाम,महेंद्र बारसागडे,आ.साखरकर मॅडम,आ.सरपंच धारणे मॅडम,आ.सेंदरे मॅडम व इतर अतिथी प्रामुख्याने उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलीत करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.याचबरोबर विनंम्रपणे अभिवादन करण्यात आले.

          कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्य अतिथी व अध्यक्ष यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनपटलावर प्रकाश टाकण्यात आला व आजच्या परिस्थितीतील स्थितांतरे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.